Sangli Chandrakant Patil Vs Jayant Patil: राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या सत्तासंघर्थास सांगली जिल्हा परिषदेत मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष बसणार असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावरुनच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी केली जात आहे," असे खळबळजनक वक्तव्य जयंत पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आणि मित्रपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच विधान केले होते की, अजित पवार गटाचे सदस्य हे महायुतीचा भाग असल्याने त्यांना भाजपच्या बाजूने कौल द्यावा लागेल. इतकेच नव्हे तर, 'व्हीप' न पाळल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता.
Kolhapur News: कोल्हापुरात रस्ते बांधकामात महाघोटाळा? मनसेचा आक्रमक पवित्रा, अधिकाऱ्यांची पळापळ
जयंत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटलांच्या या भूमिकेवरुन जयंत पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. आमची निवडणुकीत घड्याळासोबत आघाडी होती. मग घड्याळावर निवडून आलेल्या उमेदवारांना भाजप कसे काय दम देऊ शकतो? घड्याळ हा स्वतंत्र पक्ष आहे, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. असे असताना भाजपाच्या नेत्यांनी दमदाटी करणे किंवा भाजपाच्या एखाद्या नेत्याने त्यांना नियम सांगणे म्हणजे एका पक्षाची दुसऱ्या पक्षावर दादागिरी सुरू आहे असा त्याचा अर्थ होतो, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
"महायुती म्हणून एकत्र येण्याचे ठरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सदस्य हे घड्याळ चिन्हावर निवडून आले आहेत, त्यांना पक्षाचा व्हीप पाळावा लागेल. अन्यथा ते अपात्र होऊ शकतात असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला होता. त्यांच्या याच वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे. दरम्यान, या घडामोडींमध्ये सत्तेची खुर्ची नेमकी कोण मिळवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Pune News : खळबळजनक! इंदापूर तालुक्यात 25 मुली जिहाद्यांच्या ताब्यात? पडळकरांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world