Sanjay Raut Health: मोठी बातमी! संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर... प्रकृतीत गंभीर बिघाड

Sanjay Raut Letter: दोन महिने ते सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहित त्यांनी ही महत्त्वाची बातमी दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Sanjay Raut Health Update:  शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ, राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने दोन महिने ते सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार आहेत. कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहित त्यांनी ही महत्त्वाची बातमी दिली आहे. 

काय आहे संजय राऊत यांचे पत्र?

"सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र ! आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

याआधी काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांना अचानक  मुंलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना घशाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी ते रुग्णालयात एडमिटही होते. अशातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांनी दोन महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

 बुलढाण्यात मतदार यादीचा 'महाघोळ'! 5000 मृत, एकाच घरात सर्वधर्मीय 126 मतदार

ठाकरेंचे निष्ठावंत, विरोधकांवर हल्लाबोल

दरम्यान,  बाळासाहेब ठाकरेंपासून ठाकरे कुटुंबांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी संजय राऊत यांची ओळख आहे. ते सामनाचे संपादकही आहेत. भाजपसह महायुतीच्या नेत्यांना विविध मुद्द्यांवरुन ते कोंडीत पकडत असतात. शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडत शिंदेगटावर वारंवार तोफ डागली.