Narkatla Swarg: 'शिवसेनाप्रमुख असते तर...', उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांचे कौतुक

आपल्याला लढावे लागेल, जिंकावे लागेल. त्याची उर्मी या पुस्तकाने दिली आहे. हे पुस्तक वाचा आणि सर्वांना वाचायला द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: 'सरकार येतात, जातात. हे सरकारही घालवावे लागेल. आपल्या लढावे लागेल, जिंकावे लागेल. त्याची उर्मी या पुस्तकाने दिली आहे," असे म्हणत शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे तोंडभरुन कौतुक केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"घर ढेपाळलं की लढवय्या लढू शकत नाही. संजयच्या कुटुंबियांनी धाडस दाखवले. आयुष्याच्या प्रवासात माणसे भेटत राहतात काही सोबत राहतात काही संधीसाधू पळून जातात. बाळासाहेबांचेच एक वाक्य आहे 100 दिवस शेळीहून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर मराठी माणसाला जिद्द आणि आत्मविश्वास दिला. ते बघत आहेत मी दिलेले किती निष्ठावान आहेत आणि पळालेले भाडखाऊ किती आहेत" असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

"आज जे आपण बघतोय त्याला लोकशाही मानायची ही हुकूमशाही..हिटलरला संपूर्ण जग घाबरत होते पण त्यालाही आत्महत्या करायला लागली. हा हुकूमशाहीचा शेवट असतो. अनिल देशमुख माझ्या मंत्रीमंडळातील गृहमंत्री होते. असा कोणता देश असेल जिथे मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना अटक होते. आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे. ईडी सीबीआय, पीएमए कायदा लावण्याचा अधिकार केंद्राला असेल तर राज्यालाही तो असला पाहिजे.. हा सगळा प्रकार याच्याविरुद्ध लढत राहिले पाहिजे," असंही ते म्हणाले.

( नक्की वाचा : Spy Racket : पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी गेली आणि हेर बनली! ISI एजंट महिला YouTuber सह 6 जणांना अटक )

"शिवसेनेला संपवण्याचा काही पहिला प्रयत्न नाही. बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास झाला होता. आज आपल्याला बरं वाटतंय पण प्रत्यक्ष त्यांनी काय भोगले असेल. आज शिवसेनाप्रमुखांना अभिमान वाटला असता.सरकार येतात, जातात. हे सरकारही घालवावे लागेल. आपल्याला लढावे लागेल, जिंकावे लागेल. त्याची उर्मी या पुस्तकाने दिली आहे. हे पुस्तक वाचा आणि सर्वांना वाचायला द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.