प्रतिनिधी, सूरज कसबे
आळंदीच्या कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा यंदा 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरच्या दरम्यान पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी भगवान विठ्ठलाची पालखी सुद्धा काही आठवड्यांपूर्वी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. या संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत दाखल होत असल्यामुळे आळंदी देवस्थानच्या वतीने संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या सोहळ्याची सुरुवात 23 नोव्हेंबर रोजी परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारवर असलेल्या हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने होणार आहे, तर मुख्य संजीवन समाधी सोहळा हा 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान होणार आहे. तर सांगता 1 डिसेंबर रोजी रात्री 9.30 ते 12.30 च्या दरम्यान माऊलींच्या छबीना मिरवणुकीने होणार आहे. या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीवर दररोज पवमान अभिषेक, दुग्धारती, महापूजा , नैवद्य ,भजन ,कीर्तन ,पारायण हे परंपरेनुसार होणार असल्याची माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
नक्की वाचा - यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त
अशी असणार संजीवन समाधी सोहळ्यातील प्रमुख कार्यक्रमाची रूपरेषा.....
शनिवार 23 नोव्हेंबर -
सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान संजीवन समाधी मंदिराच्या महाद्वारावर परंपरेनुसार हैबत बाबा यांचे पायरी पूजन गुरू हैबत बाबा यांच्या वंशजांच्या हस्ते.....
भागवत एकादशी 26 नोव्हेंबर -
दुपारी 1 वाजता माऊलींची नगर प्रदक्षिणा
बुधवार 27 नोव्हेंबर -
दुपारी 4 ते 7 दरम्यान माऊलींचा रथोत्सव संपन्न होईल.
कार्तिक त्रयोदशी 28 नोव्हेंबर -
सकाळी 9 ते 12 पर्यंत ह.भ. प.नामदास महाराज दास यांचे कीर्तन त्यानंतर दुपारी 12 दरम्यान मुख्य संजीवन समाधी सोहळा आणि माऊलींच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी , घंटानाद आणि आरती होईल.
रविवार 1 डिसेंबर -
रात्री 9.30 ते 12.30 च्या दरम्यान माऊलींचा छबिना निघेल त्यानंतर आरती होईल.