जाहिरात

यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त  

नेहमीपेक्षा यंदा लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त असल्याचं म्हटलं जात आहे.

यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त  
मुंबई:

तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांची यादी धुंडाळली जाते. यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी नोव्हेंबर, डिसेंबर ते मार्च 2025 पर्यंत तब्बल 42 मुहूर्त आहेत. विशेष म्हणजे लग्नाच्या सर्वाधिक तारखा या डिसेंबर महिन्यात आहेत. दा कृ सोमण यांनी यासंदर्भात एका वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली. 

लग्न पाहवं करून आणि घर पाहावं बांधून अशी एक म्हण आहे. त्यामुळे घर बांधण्याप्रमाणे लग्नाचा पसारा मोठा असतो. त्यासाठी वेळही जास्त लागतो.  लग्नाच्या मुहूर्तांच्या तारखा समोर आल्याने कुटुंबीयांसाठी तयारी करणं अधिक सोपं जाईल. त्याशिवाय हॉल आणि कॅटरर्स बुकिंग आधीच करून ठेवावं लागतं. त्यानुसार ऐनवेळीचा होणारा घोळ टाळण्यासाठी सोईनुसार या तारखा पाहून कुटुंबीयांनी आधीच तयारी सुरू केली तर सोपं जाईल.  

पाच महिन्यात लग्नाचे 42 मुहूर्त

विवाह मुहूर्ताच्या तारखा

नोव्हेंबर, 2024 :
17, 22, 23, 25, 26, 27

डिसेंबर, 2024 :
3, 5, 6, 7, 11, 12, 14, 15, 20, 23, 24, 26

जानेवारी, 2025 -
16, 17,19, 21, 22, 26

फेब्रुवारी-
3, 4, 7, 13, 16, 17, 20, 21, 22, 23, 25

मार्च- 
1, 2, 3, 6, 7, 12, 15

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: