Sant Muktai: संत मुक्ताईचा आषाढी वारी पालखी सोहळा ज्येष्ठ शुद्ध नवमी गुरुवार दिनांक 5 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मुक्ताईनगर कोथळी येथील संत मुक्ताईच्या समाधी मंदिरावरून हा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तापीतीर ते भीमातीर असा 29 दिवस सुमारे 600 किलोमीटरचा 6 जिल्ह्यांमधून पायी प्रवास करून आषाढ शुद्ध अष्टमी गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी संत मुक्ताईचा पालखी सोहळा हा पंढरपूर मध्ये दाखल होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आषाढी एकादशीनिमित्त संत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यात सर्वात प्रथम पंढरपूरकडे प्रस्थान करण्याचा संत मुक्ताईच्या पालखीचा मान आहे. दरम्यान संत मुक्ताई समाधी मंदिर संस्थांच्या वतीने आषाढी पालखी सोहळ्याची पत्रिका ही प्रकाशित करण्यात आलेली आहे.
(नक्की वाचा- Shirdi News: दुबईतून शिर्डीत आले 'गोल्डन ॐ साई', साईभक्ताकडून भरभरुन दान, किंमत किती?)
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025
-
18 जून : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम
- 19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
- 20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
- 21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
- 22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
- 23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
- 24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
- 25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
- 26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
- 27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
- 28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
- बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
- 29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
- इंदापूर येथे गोल रिंगण
- 30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
- 1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम
- निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण
- 2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
- माळीनगर येथे उभे रिंगण
- 3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
- 4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
- बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
- 5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
- वाखरी येथे उभे रिंगण
- 6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
- 10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात