Walmik Karad: वाल्मिक कराडसह 100 जणांना दणका! संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई

हत्येचा मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह अनेकांकडे परवानाधारक शस्त्र असल्याचे समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.  आता या शस्त्र परवान्यांबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

बीड: बीडमधील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या एक महिन्यांपासून राज्यात हे प्रकरण गाजत असून यामध्ये दररोज नवनव्या अपडेट्स समोर येत आहेत. या हत्येनंतर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. या हत्येचा मास्टरमाईंड म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह अनेकांकडे परवानाधारक शस्त्र असल्याचे समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.  आता या शस्त्र परवान्यांबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल 100 जणांचा शस्त्रपरवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शस्त्र परवाना रद्द झाल्यानंतर नोटीस पाठवून  पोलिस ठाण्यात शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीडच्या गुन्हेगारीमधील मास्टरमाईंड आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडलाही नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या वाल्मिक कराड सीआयडी कोठडीत असल्याने सुनावणीस हजर राहू शकत नाही. त्यामुळे त्याच्या शस्त्र परवान्याबाबत निर्णय राखून ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. कराड बाहेर येताच परवाना रद्दची कारवाई होऊ शकते. तसेच  शस्त्र परवाना रद्द किंवा निलंबित केल्यानंतरही वापरल्यास गुन्हा दाखल होणार आहे. 

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात  गतीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी दि.14 जानेवारी रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय.. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार असून यामध्ये वाल्मीक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच मकोका लावावा, आरोपी कृष्णा आंधळे याला तत्काळ अटक करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार ? 90 तास काम करा! L&T चेअरमन यांचा सल्ला)

तसेच  सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती कुटूंबीयांना द्यावी , पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करुन सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून या निवेदनावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह 25 ग्रामस्थांच्या स्वाक्षरी देखील आहेत.