Santosh Deshmukh Case Update: बीडमधील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये ही कारवाई होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता या सर्व आरोपींंवर मोक्का कायद्याअंतर्गत अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सुरुवात केली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून या सर्वांवर आता मोक्का लावण्यात आला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिख घुले, महेश केदार, या सर्वांवर मोक्का लावण्यात आला आहे. यामध्ये वाल्मिक कराडला मात्र वगळण्यात आलं आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह इतर सात जणांवर खंडणी हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुले विरोधात यापूर्वी अपहरण केल्याची नोंद आहे. यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचे दिसून येते. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मोक्का कधी लावला जातो?
अपहरण,खंडणी, हत्या,अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. गुन्ह्यात फक्त एक व्यक्ती असेल तर मोक्का लावता येत नाही. जेव्हा गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक, म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लावला जातो. मोक्का लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येते नाही. पण मोक्का लागत नाही आणि अशावेळी मोक्का लावण्यात आल्याचे न्यायालयाच्या निर्दशनात आणून दिल्यास जामीन मिळतो.
नक्की वाचा - Share Market Fraud : शेअर मार्केटचं वेड, 4 कोटींचा नफा; सत्य समजताच उच्च न्यायालयाच्या वकिलांना बसला धक्का!