सध्या ऑनलाइन व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. अगदी किराणादेखील ऑनलाइन ऑर्डर केला जातो. त्यात मोठमोठे व्यवहारही ऑनलाइन केले जात असल्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान शेअर खरेदी-विक्रीद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून उच्च न्यायालयातील 52 वर्षीय वकिलाची दीड कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बँक व्यवहाऱ्यांच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तक्रारदार खार येथील रहिवासी असून त्यांना 13 जुलै 2024 रोजी शेअर खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यांना एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. अमेरिकेतील सिक्युरिटी नावाने हा ग्रुप तयार करण्यात आला होता. पोलिसांच्या तक्रारीनुसार, दिलेल्या लिंकवर वकिलांनी क्लिक केल्यानंतर त्यांना व्हीआयपी व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.
नक्की वाचा - Lucknow Crime : बांगलादेशी...धर्मपरिवर्तन अन् मंदिरावरुन वाद; अर्शदने आई अन् 4 बहिणींची का केली हत्या?
त्यात गुंतवणुकीबाबत सल्ला दिला जात होता. वकिलांनी सुरुवातीला लहान रक्कम गुंतवून पाहिली आणि त्यांना फायदा झाल्याचं निदर्शनास आले. वकिलांचा विश्वास संपादन केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना बीव्हीई नावाचे ॲप इन्स्टॉल करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर वकील त्या ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ग्राहक सेवा सहाय्यक त्यांना गुंतवणुकीबाबत मदत करीत होता आणि गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी मार्गदर्शन करीत होता.
नक्की वाचा - Crime news: आधी प्रेम केलं मग हत्या! तो सुटलाच होता, पण डी मार्टच्या पावतीमुळं अलगद अडकला
हळूहळू तक्रारदाराने एक कोटी 58 लाख रुपये गुंतवले. ॲपमध्ये त्यांना चार कोटी रुपये नफा झाल्याचे दिसत होते. त्यावेळी तक्रारदार वकिलांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण पैसे हस्तांतरित झाले नाहीत. त्यांनी सेवा कार्यकारी व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने रकमेवर कर भरल्यानंतर ती हस्तांतरित होईल, असे सांगितले. कर भरूनही तक्रारदारांना रक्कम काढता आली नाही. त्यानंतर त्यांना व्हॉट्स ॲप ग्रुपमधून काढण्यात आले. यानंतर वकिलाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर मुंबईतील वकिलाने या प्रकरणात पोलिसात तक्रार केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world