बीड: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे चार्जशीट दाखल केल्यानंतर आरोपींनी काढलेले व्हिडिओ आणि फोटो समोर आले. आरोपींनी केलेल्या हैवानी कृत्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता या प्रकरणातील आणखी एक सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली होती. 9 डिसेंबर रोजी हत्येच्या दिवशी आरोपींनी मोकार पंथी नावाच्या ग्रुप वर संतोष देशमुख यांना मारताना मोकारपंथी नावाच्या व्हाट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता आणि हाच व्हिडिओ कॉल देशमुख प्रकरणामध्ये महत्त्वाचा पुरावा असल्याचे आरोप पत्रात नमूद केले गेले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याने हत्येच्या दिवशी मोकारपंती या व्हॉट्सॲप ग्रुपवर चारवेळा व्हिडिओ कॉल केला होता. या व्हिडिओ कॉलमधील संवाद आता समोर आला आहे. कृष्णा आंधळे याने संतोष देशमुख यांना मारहाण सुरु असताना संतोष देशमुख यांचा चेहराही दाखवला. ज्यावेळी सरपंचाचा चेहरा दाखवला, त्यावेळी त्यांच्या जखमांमधून रक्त येत होते, असा जबाब त्या ग्रुपमधील चार सदस्यांनी दिला आहे.
हाच तो मस्सजोगचा सरपंच, त्यादिवशी सुदर्शन भैय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला. असे म्हणत कृष्णा आंधळेने तीनवेळा देशमुख यांचा चेहरा दाखवला. याचवेळी व्हॉट्सॲप ग्रुपमधील एका सदस्याने वाघ्या लई मारला आहे, आता बास करा सरपंचाला मारायचे... अशी सूचनाही दिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कृष्णा आंधळे याने चार वेळा केला होता मोकारपंती ग्रुप वर व्हिडिओ कॉल:
1)पहिला कॉल: 9 डिसेंबर रोजी 5 वाजून 14 मिनिट , 44 सेकंद (कॉल ड्युरेशन 17 सेकंद)
2) दुसरा व्हिडिओ कॉल: 5 वाजून 16 मिंट 45 (कॉल ड्यूरेशन 17सेकंद)
3) तिसरा व्हिडिओ कॉल: 5 वाजून 19 मिनिट (कॉल दुरेशन 2.03 मिनिट)
4) चौथा व्हिडिओ कॉल: 5 वाजून 26 मिनिट 20 सेकंद (2.44 मिनिट)