
Bhaiyyaji Joshi on Marathi : महाराष्ट्रात आधीच मराठी-कानडी भाषेवरुन वाद सुरू असताना आता आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात त्यातही मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी (Marathi language) शिकावी अशी शिवसेना, मनसेची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्र मराठी माणसांना रोजगार मिळावा आणि महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली जावी यासाठी ही पक्ष आग्रही राहिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही दिवसांपूर्वी मराठी-कानडी वादावरुन मारहाण झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं. त्यातच मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकण्याची गरज नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - PM Internship Scheme साठी अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख, इतके हजार मिळणार आर्थिक साहाय्य
भैय्याजी जोशी नेमकं काय म्हणाले?
मुंबईत आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी विद्याविहार येथील एका कार्यक्रमादरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना हे वक्तव्य केलं आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा त्या कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. पण त्या त्या भागाची एक भाषा असते. गिरगावात मराठी बोलणारे जास्त मिळतील. तर घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world