3 days ago

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे बीडमधील वातावरण तापलं आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणासाठी न्याय मागितला जात असताना दुसरीकडे वाल्किम कराडवर खोटे आरोप केले जात असल्याचा दावा करीत समर्थकांकडून आंदोलन पुकारलं जात आहे. 

Jan 16, 2025 22:22 (IST)

Live Update : 'गंगेत स्नान केल्यानं त्वाचारोग होतो', मुनगंटीवार यांनी दिलं स्पष्टीकरण

 गंगेत स्नान केल्याने त्वचारोग होतो, असे वक्तव्य आपण वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे केले. मात्र त्याचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यांनी चंद्रपुरात आयोजित वातावरण बदलावरील परिषदेत गंगेत स्नान केल्यावर त्वचारोग होतो, असे वक्तव्य केले होते. या कार्यक्रमात राज्यपालही उपस्थित होते.

Jan 16, 2025 18:12 (IST)

छत्तीसगड विजापूरच्या जंगलात 17 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड विजापूरच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत 17 नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमक अजूनही सुरुच आहे. 

विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तीन जिल्ह्यांतील जवानांकडून नक्षलवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली जात असून, ग्रेहाऊंडचे जवानही या कारवाईत सहभागी आहेत. विजापूरच्या मरुधबाका आणि पुजारी कांकेर परिसरात सकाळी 9 वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Jan 16, 2025 17:13 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 वर्षांच्या विद्यार्थ्याची राहत्या फ्लॅटमध्ये हत्या

 छत्रपती संभाजीनगर शहरात एका बीसीएसच्या विद्यार्थ्याची फ्लॅटमध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. प्रदीप विश्वनाथ निपटे (वय 19) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याची अज्ञातांनी फ्लॅटमध्ये शिरुन हत्या केली आहे. प्रदीपच्या हत्येला कॉलेजमध्ये झालेल्या वादाची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय आहे.

Jan 16, 2025 16:25 (IST)

विरारमधील कविता बडाला 'सुटकेस हत्या' प्रकरणातील आरोपींना जन्मठेप

विरारमधील कविता बडाला अपहरण, खंडणी आणि हत्या प्रकरणात चारही आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. वसई कोर्टानं ही शिक्षा सुनावलीय. आरोपी मोहितकुमार भगत, रामअवतार शर्मा, 

शिवा शर्मा आणि युनिता शरवनंद यांना न्यायालयानं जन्मठेप सुनावली आहे. त्याचबरोबर फिर्यादींना 61 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्या. एस.व्ही. खोंगल यांनी दिले आहेत.

रत्नम इन्फोटेक कंपनीमधील चैन मार्केटिंगच्या आर्थिक वादातून अपहरण करून कविता यांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर कविताचा मृतदेह बॅगमध्ये भरून डहाणू तालुक्यात ती बॅग जाळून टाकण्यात आली होती. 

Advertisement
Jan 16, 2025 15:21 (IST)

Live Updates: केंद्र सरकारचे सर्वात मोठे गिफ्ट, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

 केंद्र सरकारने केंद्रीय कर्चमाऱ्यांना सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. 1 जानेवारी 2026 पा केंद्र सरकारने केंद्रीय कर्चमाऱ्यांना सर्वात मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. 1 जानेवारी 2026 पासून हा नियम लागू होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.सून हा नियम लागू होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Jan 16, 2025 14:55 (IST)

Nana Patole: सैफ अली खानवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा: नाना पटोले

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे. महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाजपा सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रीय आहेत. मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत. बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशिर्वाद, परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू, वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही. 

गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद सोडून काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Advertisement
Jan 16, 2025 14:48 (IST)

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले

पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाने 10 ते 15 जनांना चिरडल्याची घटना घडली आहे.  अपघातात काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती आहे. अनेक दुचाकी फोरव्हिलर तसेच कार पायी चालणाऱ्या प्रवाशांना कंटेनर चालकांने चिरडले .अपघात करून महामार्गावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून कंटेनर चालकाला पकडले. कंटेनर चालकाने मद्य प्राशन केल्याची प्राथमिक माहिती. आरोपी कंटेनर चालक शिक्रापुर पोलियांच्या ताब्यात..

Jan 16, 2025 13:00 (IST)

Dhananjay Munde: धनंजय मुंडे परळी वैजनाथच्या दर्शनाला

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजत असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आज धनंजय मुंडे हे बीडच्या दौऱ्यावर असून ते परळी वैजनाथच्या दर्शनाला गेलेत. 

Advertisement
Jan 16, 2025 12:05 (IST)

Ajit Pawar Speech: जिल्ह्यातील, तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना बारामतीचे प्रदर्शन बघण्याचे आदेश द्या: अजित पवार

दरवर्षी या प्रदर्शनात चांगल्या पद्धतीची भर पडत चालले आहे.  सगळ्या माणसांपेक्षा तिथला भोपळा मला उंच  वाटला, नवु फूट लांब.जर कोणाला सांगितलं तर म्हणतील दुपारी याला चढली आहे पण ही वस्तुस्थिती आहे. राजगुरुनगरला कांद्याचे संशोधन झालं पण ते आता शेतकऱ्यांच्या शेतावर गेले पाहिजे. 

पाच वर्षाच्या करता ही सरकार सत्तेवर आल आहे. माणिकराव अतिशय चांगल्या पद्धतीने आपापल्या विभागाचा उपयोग त्या त्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करू.  मला नोट तयार करून द्या उद्याच्या अर्थसंकल मध्ये काही गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करीन. इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. 

ट्रस्टला गेल्यानंतर स्व.आप्पासाहेब काकांची आठवण येते. माणिकराव म्हणाले की आप्पा साहेबांच्या स्वभावातला थोडासा भाग राजेंद्र पवारांच्यात उतरला आहे. राज्याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करता येतील त्या करू वेळ पडली तर देशाचे कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी बोलू.

 बारामतीत एक पशुवैद्यकीय महाविद्यालय द्यायचं आहे मी पंकजा मुंडे यांना बोललो त्या म्हणाल्या दादा दोन देऊ एक परळीला देऊ एक बारामतीला. मी म्हणालो ठीक आहे आमचं असंच असतं. उद्या एक परविन तापमानाचा फायदा आहे कारण बारामतीला पण मिळतंय. कृषी विज्ञान बारामतीत विकासकामे सुरू आहे रस्त्याची कामे सुरू आहेत. लोकांना गैरसोय  होऊ नये याचा माझा प्रयत्न असतो.  आपलं काम बोलत असतं.  जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि तालुक्याचे कृषी अधिकारी यांना बारामतीचे कृषी प्रदर्शन बघण्याचे आदेश उद्याच्या उद्या माणिकराव द्या, असं अजित पवार यावेळी म्हणाले. 

Jan 16, 2025 11:56 (IST)

Nagpur Crime: वडिलांच्या मृत्यूला कारण ठरल्याचा राग, तरुणाने जुन्या मित्राला संपवलं

नागपुरात जुन्या वादावरून एकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन जुन्या मित्राची तीक्ष्ण शस्त्राने हत्या केल्याचे पुढे आले आहे. नागपूर शहरातील धंतोली भागात ही घटना घडली आहे. 28 वर्षीय लकी उर्फ करण नायनेकर असे मृताचे नाव असून  त्याचा मित्र कुणाल राऊत यांनी पत्नी आणि दोन नातेवाईकांसोबत जुन्या वादातून हत्या केल्याचे पुढे आले आहे. 

या आधीही दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यावेळी गुन्हा दाखल झाल्याने त्याच काळात करण याच्या पित्याचे हार्ट अटॅक ने निधन झाले होते. करण आपल्या पित्याच्या मृत्यूला कुणाल याला कारणीभूत समजत होता आणि त्याला ठार मारण्याची धमकी देत होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चार ही आरोपींना अटक केली आहे.

Jan 16, 2025 11:53 (IST)

Pankaja Munde News: बारामतीसारखी शहरं राज्यभर व्हावी: पंकजा मुंडेंकडून कौतुक

मला पवार पॅक्ट कार्यक्रमांमध्ये सॉरी पावर पॅक्ट कार्यक्रमांमध्ये खूप वेगळं वाटतंय. मला अजित पवारांबरोबर काम करण्याचा योग आला नाही पण आज काम करताना माझ्या जीवनातील सकाळ कधीच एवढी छान गेली,आज काम करण्यात गेली

नेहमी डोकं खराब करणाऱ्या बातम्या पाहण्यात जाते . आज खूप चांगली सकाळ गेली. अशाच महिन्यातून एकदा बोलवत जावा म्हणजे इकडच्या चागल्या गोष्टी शिकता येतील. कृषी प्रदर्शनात खूप चांगल्या गोष्टी पाहिल्या.. बारामतीत चांगला एक मोठा पशू दवाखाना होयला हवा.

आरटीपीसीएल इंटेलिजन्स वरती खूप चांगले प्रयोग इथे मी पाहिले. माझ्या भागातील दुष्काळग्रस्त भागांसाठी हा प्रयोग कसा वापरता येण्यासाठी प्रयत्न करीन.  माझ्या डिपार्टमेंट कडून काही योगदान लागल्यास अजित दादा तुम्ही शब्द टाका तो शब्दाने पूर्ण करू.  बारामतीच फक्त बारामती असू नये राज्यात अशी शहर घडावी.. असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. 

Jan 16, 2025 11:49 (IST)

Manikrao Kokate Speech: जास्तीत जास्त कृषी खात्यात पारदर्शकपणा कसा येईल यासाठी माझा प्रयत्न, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

* एवढ्या सकाळी उठून कामाला लागण्याचा पहिलाच दिवस आम्ही तर माझ्या आयुष्यात बघत आहे. दादांना माहिती आहे मी उशीर उठतो दादांनी मला रात्री सांगितलं उद्याचा दिवस तस्ती घ्यावी लागेल. दादांना मी सांगितलं जिथे गरज लागेल तिथे मी खांद्याला खांदा लावून उभा असतो. पहाटेचा शपथविधी आठवा मीच पाठीमागे उभा होतो. 

आम्ही हाडाचा शेतकरी.1986 सालि मी 100 टन ऊस काढल्यामुळे कोपरगाव कारखान्याने  बक्षीस दिलं होतं. औषधाची शेती मी कधी बघितले नाही.  उसावर कधी औषध मारावा लागत नव्हती.  काळ बदलला वेळ बदलला खाणारी तोंड वाढली उत्पादनासाठी मागणी वाढली.  वेगवेगळे बियाण आली. रोगराई वातावरणाच संतुलन बिघडत गेलं.

थोडंसं संकट आल की शेतकरी मेटाकुटीला जातो कर्जबाजारी होतो. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा जन्म झाला आहे  बारामती केव्हीके देशातील नंबर एक ची संस्था आहे. आप्पासाहेब पवार आणि माझा जवळचा संबंध होता.  त्यावेळी सिन्नर आणि बारामती जवळपास सारखीच होती.   सिन्नरमध्ये अजित पवारांनी जी मला मदत केली त्यामुळे सिन्नर भागात मोठा बदल करू शकलो. जवळपास 18000 करोड रुपये त्या भागात काम करण्यासाठी दादांच्या माध्यमातून मला मिळाले

तंत्रज्ञान आहे पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही.  तंत्रज्ञान तालुका पातळीवर गाव पातळीवर कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शहरात शेतकऱ्याचा शेतमाल विक्री करण्यासाठी जागा राखीव ठेवली पाहिजे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना करत आहे. त्या राबवत असताना काही वेळा चुका होतात भ्रष्टाचार होतो. एक रुपयांमध्ये पिक विमा दिला पण त्या विमा मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या लोकांच्या तक्रारी आल्या आहेत.त्याची चौकशी लावली आहे.

 राज्य सरकारने ज्या योजना शेतकऱ्यांना दिल्या त्याचा तपास करावा लागेल की शेतकऱ्यांना फायदा होतो का त्या योजना चालू ठेवायचे की बंद करायच्या. आता पाठीवरच्या पंपाने फवारणी करण्याचे दिवस गेले. अनावश्यक आहे आणि आवश्यक आहे त्या योजना सुरू केल्या पाहिजेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी झाला खात्यावर पैसे जाऊ लागले.

अशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या योजनांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरच पैसे कसे जातील यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. उत्पादन वाढल्याचे भाव घसरतात. लागवड  वाढली की हे होत. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.जास्तीत जास्त कृषी खात्यात  पारदर्शकपणा कसा येईल यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. कृषी खात्याच्या सचिवांना सांगितला आहे की बारामती बघा. 

राजेंद्र पवार यांना कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे राजकीय अपवादामुळे त्यांनी तो घेतला नाही पण त्यांचा पुरस्कार पेंडींग आहे मी त्यांना विनंती करतो की आपण आम्हाला वेळ कळवा आणि तुमचा पुरस्कार स्वीकारा. अतिशय योग्य माणसाला तो पुरस्कार मिळत आहे. दादाला जे कळतं ते कोणालाच कळत नाही असं मला वाटतं.  मी त्यांना कृषी खत द्या असं मागितलच नव्हतं, विनंती केली नव्हती की मला हे खात द्या.

Jan 16, 2025 11:15 (IST)

Sharad Pawar: गृहमंत्र्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे: शरद पवार

मुंबईतील कायदा सुव्यवस्था किती ढासळत गेली याचे हे लक्षण आहे. त्याच भागात मध्यंतरी एकाची हत्या झाली,आज एकावर हल्ला झाला हे सगळं चिंताजनक आहे. राज्य सरकारने विशेषत: मुख्यंत्री हे गृहमंत्री आहेत त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

Jan 16, 2025 11:05 (IST)

Accident news: गेट टु गेदर अन् ती भेट अखेरची ठरली! भीषण अपघातात दांपत्य ठार

जळगावच्या शहापूरजवळ झालेल्या ट्रक व कंटेनरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली.  यामध्ये पती- पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दहावीचे गेट टु गेदर आटोपून, मित्रपरिवार आणि नातलगांची भेट घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ झालेल्या ट्रक व कंटेनरच्या अपघातात अमळनेर मधील दांपत्य ठार झाले असून पियुष सोनवणे व वृंदा सोनवणे असे अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या अपघातात सोनवणे दांपत्याची पाच वर्षाची मुलगी कृष्णाली ही बचावली आहे.  अमळनेर तालुक्यातील मारवड येथे दहावीच्या वर्गातील मित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदर साठी सोनवणे दांपत्य हे अमळनेर मारवड येथे आले होते. मात्र अमळनेर कडून मुंबईकडे जात असताना अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या मित्रपरिवार व नातलगांची ही भेट अखेरची ठरली आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील मारवळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jan 16, 2025 10:50 (IST)

Actor Saif Ali Khan Attack Update: सैफ अली खानवरील हल्ल्यात महिला कर्मचारीही जखमी

सैफ अली खान याच्या घरी रात्रीच्या वेळी घटना घडली आहे. 

सैफ अली खान यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरूआहे

या हल्यात एक महिला कर्मचारी ज्या घरात काम करत होत्या त्या जखमी आहेत. अरियामा फिलिप...उर्फ लिमा... या जखमी महिला कर्मचारीचं नाव आहे, पोलिस तपास करत आहेत.

Jan 16, 2025 10:39 (IST)

Pune News: पुण्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुण्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या 

पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत 

वाहतूक विभाग , पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत या बदल्या आहेत

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

Jan 16, 2025 10:32 (IST)

Farmer News: रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ; शेतकरी चिंतेत

रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 50 रुपयांपासून ते 300 ते 350 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकरी अगोदरच त्याच्या शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच आता वाढणाऱ्या रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. 

खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असताना कसेबसे रब्बी हंगामात पेरणी केली. त्यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आता अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबवली होती मात्र उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढीव दरानुसार डीएपी डाय अमोनिया फॉस्फेट खताची किंमत प्रती बॅग १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपये झाली आहे. तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४७० रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहेत.तर सुपर फॉस्फेट ४७० वरून ५२० रुपयांपर्यंत दर वाढणार आहेत. या नवीन वर्षात सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.

Jan 16, 2025 10:18 (IST)

Baramati News: शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर; बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

 बारामती मध्ये कृषिक 2025 या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या शुभहस्ते पार पडले, या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे निमंत्रण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांना होतं मात्र शरद पवार उपस्थित राहिले नाहीत. 

यानंतर शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये या कृषी प्रदर्शनासंदर्भात महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. या मंचावर जी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये शरद पवार यांच्या शेजारीच अजित पवार यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

Jan 16, 2025 09:41 (IST)

Bajrang Sonwane: एवढी पॉपर्टी असेल तर ईडी लागलीच पाहिजे.. खासदार बजरंग सोनवणे

न्यायलयाने वाल्मीक कराड यांना ७ दिवसांची कोठडी दिली आहे. परळीमधील लोकप्रतिनिधी आणि मी खासदार म्हणून शांत राहण्याचे आवाहन करतो. परळीमधील नेत्यांची जबाबदारी आहे की शांततेचे आवाहन करावं. त्यांना (पंकजा मुंडे) माहिती नसेल, कारण त्यांना आता कामं असतील. 

आम्ही पण वाल्मीक कडे ४,५ मोबाईल फोन पाहिले आहेत. वाल्मीक कराड याला वी आय पी ट्रीटमेंट आहे का याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे. बजरंग सोनवणे ची खुली किताब आहे, माझ्या बद्दल एक पी आय बोलला होता, जो कोणी बोलत असेल त्यांनी बोलावं. धनंजय मुंडे यांची कधी बैठक झाली याबद्दल मला माहिती नाही पण शासकीय दौऱ्यात ते मुक्काम परळी मध्ये करणार होते एवढंच माहिती आहे.  . कोणी अवैध रित्या पैसे कमवत असेल, मालमत्ता जमवत असेल, ई डी आणि सी बी आय ची मागणी केली आहे. एवढ्या प्रॉपर्टी बघितल्या म्हणाल्यावर ई डी लागलीच पाहिजे, असं खासदार बजरंग सोनवणे म्हणालेत. 

Jan 16, 2025 08:57 (IST)

Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

लीलावती हॉस्पिटलचे सीईओ निरज उत्तमानी म्हणाले, “सैफ अली खानला पहाटे 3-30 वाजता लीलावती (रुग्णालयात) आणण्यात आले. त्याला सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याच्या जवळ आहे. आम्ही त्याच्यावर ऑपरेशन करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन भूलतज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच नुकसान किती आहे हे सांगू.”

Jan 16, 2025 08:46 (IST)

Nashik News: मालेगावात गोळीबारातील फिर्यादी माजी नगरसेवक झाला आरोप

 गोळीबाराची फिर्याद देणाऱ्यानेच स्वतःवर गोळीबार घडवून आणल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात आल्याची घटना मालेगावात समोर आल्याने पोलिसांनी एमआयएम पदाधिकारी व माजी नगरसेवक नदिमुद्दीन अलीमुद्दीन उर्फ नदीम फिटर व गोळीबार करणारा अबू जैद अनिस शेख ऊर्फ येडा यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.नदीम एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा कट्टर कार्यकर्ता मानला जातो.25 नोव्हेंबर रोजी त्याच्यावर मोटार सायकल आलेल्या दोघानी बागे - ए - मेहमूद परिसरात गोळीबार केला होता.दरम्यान  नदीम याने राजकीय फायदा उचलण्यासाठी स्वतःवर गोळीबार केल्याचे समोर आले.त्याने गोळीबार करण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. विशेष म्हणजे गोळीबार करण्यासाठी पिस्टलही नदिमनेच पुरविण्याचे तपासात समोर आले.

Jan 16, 2025 08:07 (IST)

Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफअली खानवर चाकूहल्ला

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला

सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती

वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आलाय

अज्ञात चोराकडून चाकू हल्ला केल्याची माहिती

सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल

वांद्रे पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल

Jan 16, 2025 07:35 (IST)

Baramati News: आज शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार आहेत. आज 16 ते 20 जानेवारी दरम्यान बारामतीतील अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषीक कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री पंकजा मुंडे , मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्त शरद पवार आणि अजित पवार बारामतीत एकाच मंचावर येणार आहेत.यापूर्वी दोन मार्चला शरद पवार आणि अजित पवार नमो रोजगार मेळाव्यानिमित्त एकाच मंचावर आले होते.

Jan 16, 2025 07:34 (IST)

Onion Price: कांदाप्रश्नी महविकास आघाडीच्या खासदारांना बरोबर घेवू आंदोलन छेडणार, खासदार भास्कर भगरे

कांद्याच्या प्रश्नावर संसदेत अधिवेशनात दोनदा आवाज उठविला आहे.आंदोलन केले.यापुढेही कांद्याच्या भावात सुधारणा झाली नाही महविकास आघाडीच्या खासदारांना बरोबर घेवून  आंदोलन उभे करण्याचे संकेत दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी  नाशिकच्या येवल्यात दिले. सरकारने लोकप्रिय योजनांवर मोठ्या पैसे खर्च त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे अनुदान, घरकुल योजना, शेतीचे अनुदान यापासून शेतकरी वंचित  राहत आहे.शासनाने ते अनुदान तातडीने द्यावे.मते मिळविण्यासाठी निवडणुकीपूर्वी महिलांना सरसकट लाडक्या  बहिण योजनेचा लाभ देवून निवडणूक जिंकली.मात्र आता चाळणी लावली जात आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्व महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ द्यावा असेही भगरे म्हणाले.

Jan 16, 2025 07:33 (IST)

Nalasopara News: नालासोपाऱ्यात अनधिकृत रिक्षा चालकांचा हैदोस; दोन गटात जोरदार राडा

नालासोपारा रेल्वे स्थानकालगत पूर्वेला अनधिकृत रिक्षा चालकांमुळे नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे रिक्षाचालक रांगेत न थांबता बेशिस्तपणे रांग तोडून मध्येच घुसतात आणि प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे तुळींज पोलीस ठाण्यासमोर या अनधिकृत रिक्षा चालकांमुळे रोज मोठी वाहतूक कोंडी होते. यामध्ये ॲम्बुलन्स देखील अडकतात. मात्र या अतिशय गंभीर विषयाबाबत  पोलीस प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कारवाई केली जात नसल्याने अधिकृत आणि परमिट धारक रिक्षांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 यातूनच तूळींज पोलीस स्टेशनच्या परिसरात परमिट धारक रिक्षा चालक आणि अनधिकृत रिक्षा चालक यांच्यात राडा झाला होता. मात्र या दोन गटांमध्ये वाद सुरू असताना वाहतूक पोलीस मात्र बघायची भूमिका घेत असल्याचे सांगत वाहतूक पोलीस या अनधिकृत रिक्षाचालकांकडून हप्ते घेत असल्यामुळेच त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप परमिट धारक रिक्षा चालकांनी केला आहे. 

Jan 16, 2025 07:32 (IST)

Nashik News: नायलॉन मांजाने महिला पोलिसांचा गळा कापला

येवला येथे कर्तव्य बजावून  दुचाकीवरून मनमाडला परतत असताना रेखा फरताळे या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या गळा नायलॉन मांजा कापला गेल्याने गंभीर दुखापत झाली आहे.त्यांना.मनमाड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार नाशिकच्या खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Jan 16, 2025 07:31 (IST)

Dharashiv News: तंबाखूची तलफ महागात,जिल्हा परिषदेत आठ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले

राशिव शासकीय कार्यालयात अथवा आवारात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंबाखू वा अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करू नये, असा दंड आहे. मात्र, तलफ झाल्यानंतर काही कर्मचारी मागे- पुढे बघत नसल्याने बुधवारी दिसून आले. पोलिस कर्मचाऱ्यांसह आलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कार्यालयाच्या पथकाने एकाचवेळी आठ कर्मचाऱ्यांना तंबाखू खाताना रंगेहाथ पकडले. 

यानंतर त्यांना प्रत्येकी दोनशे रूपये दंड आकारण्यात आला. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ चघळणाऱ्यांवर धाराशिव मध्ये कारवाई करण्यात येते आहे. पोलीस पथक आणि आरोग्य आरोग्य विभगाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून प्रत्येकी 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच मुख्य प्रशासकीय इमारत येथे ही मोहीम राबवण्यात आली.

Jan 16, 2025 07:25 (IST)

Live Update : भानपुर गावाजवळ आढळला मृताअवस्थेत वाघ, मृत्यूचं कारण अस्पष्ट

गोंदिया शहराला लागून असलेल्या भानपुर गावाच्या जंगल भागात एक वाघ मृत अवस्थेत आढलून आला आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा अभयारण्य असून या जंगलात वाघांचा अधिवास आहे. मात्र भाणपुर गावा शेजारी असलेल्या झुडपी जंगलात वाघ मृत अवस्थेत आढळून आला याची माहिती वनविभागाला होताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असता वाघाचा मृत्यू हा नैसर्गिक रित्या झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र छवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे कळेल. मात्र भंडारा गोंदिया जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात तीन वाघांचा वाघांचा मृत्यू  झाला असल्याने वन विभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Jan 16, 2025 07:23 (IST)

Live Update : नायलॉन मांजाने महिला पोलिसांचा गळा कापला...

येवला येथे कर्तव्य बजावून दुचाकीवरून मनमाडला परतत असताना रेखा फरताळे या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या गळा नायलॉन मांजा कापला गेल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार नाशिकच्या खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.