Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठा आदेश, म्हणाले...

Satara Woman Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना मोठे आदेश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Satara Woman Suicide Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे आदेश"
CM Devendra Fadnavis X

Satara Doctor Suicide Case: सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणी आरोप-प्रत्यारोप होत असताना तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणी जोर धरत होती. घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.   

नेमके काय आहे प्रकरण? | Satara Doctor Suicide Case

साताऱ्यातील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यासह देशभरात खळबळ उडाली. फलटण शहरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला डॉक्टरने एका हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. महिलेने तळहातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर यांचे नाव लिहिले होते. गोपाल बदनेवर त्यांनी बलात्काराचा तर प्रशांत बनकरवर मानसिक छळाचा आरोप केलाय.

(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: मी लवकरच...महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठे आश्वासन)

पोस्टमार्टेम रिपोर्टमधील माहिती

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर यांच्या शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार त्यांचा मृत्यू फास लागल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. 

Advertisement

(नक्की वाचा: Satara Doctor Suicide Case: कारवाई केली नाही तर... सातारा महिला डॉक्टर प्रकरणी महिला नेत्याचा मोठा इशारा)