Satara Doctor Suicide Case: डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक

Satara Wowen Doctor Case: आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत बनकर आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

Satara Doctor Suicide Case: साताऱ्यातील फलटन डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांत बनकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रशांत बनकर आपल्या मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता.

प्रशांत बनकर हा पीडित डॉक्टर मुलगी राहत असलेल्या बिल्डिंग मालकाचा मुलगा आहे. तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने प्रशांत बनकरचंही नाव लिहिलं होतं. प्रशांत बनकरने आपल्या शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप डॉक्टर तरुणीने केला होता.

(नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आरोपी प्रशांत बनकरला फोन केला होता. दोघांमध्ये मेसेजद्वारेही संवाद झाला होता. या संदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय-भाषा वृत्तसंस्थेला माहिती दिली की, महिला डॉक्टर फलटणमध्ये प्रशांत बनकरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहत होती.

(नक्की वाचा-  Satara Doctor case: ...तर साताऱ्यातील डॉक्टर तरुणीचा जीव वाचला असता, 4 महिन्यांपूर्वी काय घडलं होतं?)

PSI गोपाल बदने फरार

या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार आहे. गोपाल बदनेने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा उल्लेख तरुणीने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

Advertisement