जाहिरात

Satara Doctor Death : 'महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या'; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

तिच्या हातून दररोज कोणाला तरी नवीन जीवन मिळत होतं. मात्र त्याच हातांनी एकेरात्री स्वत:चाच जीव घेतला.

Satara Doctor Death : 'महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या'; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Satara Doctor Death Case : एक संवेदनशील डॉक्टर... ती लोकांवर उपचार करीत होती, त्यांना वेदनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या हातून दररोज कोणाला तरी नवीन जीवन मिळत होतं. मात्र त्याच हातांनी एकेरात्री स्वत:चाच जीव घेतला. साताऱ्यातील फलटणमध्ये या महिला डॉक्टरने आपल्या हातावर पेनाने सुसाइड नोट लिहिली आणि हॉटेलमध्ये आत्महत्या केली. 

बापाने लेकीच्या शिक्षणासाठी 3 लाखांचं लोन घेतलं...

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एका गावातील ही तरुणी. वडील शेतकरी. आई गृहिणी. कुटुंबातील आर्थिक परिस्थिती तशी बेताची. मात्र मुलीचं स्वप्न मोठं होतं. तिला डॉक्टर व्हायचं होतं. यासाठी शेतकरी बापाने तीन लाखांचं लोनही घेतलं. मुलगी एमबीबीएस झाली. तिची पोस्टिंग सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात झाली. कुटुंबासाठी ही अभिमानाची बाब होती. गावातील एक मुलगी डॉक्टर झाली होती. मात्र व्यवस्थेने त्याच मुलीचा बळी घेतला. महिला डॉक्टरचा चुलत भाऊ डॉक्टर आहे. त्याने आरोप केला आहे की, रुग्णालय प्रशासनाने तिला त्रास देण्यासाठी पोस्टमार्टमची जबाबदारी दिली होती. तिला एमडीचं शिक्षण घ्यायचं होतं. ती त्याची तयारी करीत होती. मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही केला जात आहे. 

नक्की वाचा - Satara Doctor Death प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाल बदने अखेर...

जितेंद्र आव्हाडांचा मोठा आरोप...

दरम्यान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. महिला डॉक्टरने आत्महत्या केली नसून तिची संस्थात्मक हत्या करण्यात आल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिलंय, एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती ही कर्तबगार लेक!  चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी महिला डॉक्टरवर स्थानिक पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते. पण डॉक्टर कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होते. ती अनेक महिन्यापासून या प्रशासनातल्या असूरी शक्ती विरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती. 
पोलीस आणि प्रशासन आरोग्य विभागातील वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे. आज आवाज नाही उठवला तर ही जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये महिला डॉक्टरप्रमाणे मुलींची अवस्था करतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com