Satara News : सातारकरांचा नाद करायचा नाय! वेळेवर पोहोचण्यासाठी पठ्ठ्यानं पॅराग्लायडिंगने गाठलं परीक्षा केंद्र

परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी गाडी-सायकलवर तर अनेकदा धावत केंद्रावर पोहोचतात. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यातील परसणी गावातील एक पठ्ठा पॅराग्लायडिंग करीत थेट कॉलेजमध्ये पोहोचला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Reached exam center via Paragliding : सातारा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने त्याची परीक्षा वेळेत गाठण्यासाठी चक्क पॅराग्लायडिंगचा वापर केल्याचं समोर आलं आहे. पासरानी गावातील समर्थ महांगडे या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाला होता. नेहमीच्या रस्त्याने गेल्यास वाहतूक कोंडीमुळे त्याला वेळ लागणार होता. म्हणून त्याने साहसी खेळप्रेमी गोविंद येवले यांची मदत घेतली. येवले यांनी समर्थसाठी पॅराग्लायडिंगची व्यवस्था केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समर्थ आकाशातून उडत परीक्षा केंद्रावर उतरला आणि त्याने वेळेत परीक्षा दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समर्थच्या कल्पकतेचे आणि साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाईच्या एका पठ्याने चक्क पॅराग्लाइडिंग करत कॉलेज गाठलं. परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी या पठ्ठ्याने नामी शक्कल लढवली. पॅराग्लायडिंग करून कॉलेजला पोहोचतानाच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Advertisement

परीक्षेला वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थी गाडी-सायकलवर तर अनेकदा धावत केंद्रावर पोहोचतात. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यातील परसणी गावातील एक पठ्ठा पॅराग्लायडिंग करीत थेट कॉलेजमध्ये पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार, काही घरगुती कामानिमित्त समर्थ पाचगणीला गेला होता. मात्र तिथं गेल्यावर त्याला कळालं की आज आपली परीक्षा आहे. त्यानंतर परीक्षेला केवळ 15-20 मिनिटं बाकी होती. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Tomato farmer: अर्धा एकरवरचा टोमॅटो जनावरांना खाण्यासाठी टाकला, 'त्या' शेतकऱ्याने असं का केलं?

नेमके त्याच दिवशी वाई-पाचगणी रोडवरील पसरणी घाटात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे परीक्षेच्या वेळेत घाट मार्गाने जाऊन पोहोचणे अशक्य होतं. आपली परीक्षा बुडणार याचं समर्थला टेन्शन आलं होतं. मात्र पाचगणीमध्ये पाराग्लाइडिंग करणारे जीपी एडवेंचर्स ग्रुपचे गोविंद येवले यांनी समर्थला मदत करण्याचं ठरवलं. त्यांनी चक्क पॅराग्लायडिंग करत या विद्यार्थ्याला पसरणीचा घाट पार करून गावामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी घेतली.दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे समर्थने सुद्धा भीत भीतच पॅराग्लायडिंग करत खाली जाण्याचा निर्णय घेतला.आणि अखेर हा पठ्ठ्या पॅराग्लाइडिंग करत परीक्षा देण्यासाठी कॉलेजला वेळेत पोहोचला. वाई पाचगणी रोडवर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये बऱ्याचदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. परंतु या वाहतूक कोंडीवर मात करत समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने थेट आकाशातून पॅराग्लायडिंग करतच कॉलेजमध्ये एन्ट्री मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.