Amravati News: पदभार स्विकारताच सत्यम गांधी'अ‍ॅक्शन मोड'वर! ZP अधिकाऱ्यांची झोप उडवली, पहिल्याच दिवशी दणका

फिल्ड व्हिजिटला जायचं असेल तर हालचाल रजिस्टरमध्ये नोंद ठेवा. कधीही यावं, कधीही जावं - हा उद्योग आता खपवून घेणार नाही!" असंही त्यांनी बजावले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

शुभम बायस्कार, अमरावती:

Amravati  ZP CEO Satyam Gandhi News:  वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या बदलीनंतर  जिल्हा परिषदेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण होणार  आहे! नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी पहिल्याच दिवशी प्रशासनाला जबरदस्त हादरा दिलाय. "भ्रष्टाचारात कोणी आढळलं तर सोडणार नाही" - गांधींच्या या इशाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

चार्ज घेताच सत्यम गांधी 'इन ॲक्शन'

सांगली, मिराज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त तथा भारतीय प्रशासकीय सेवेतील 2020 चे युवा अधिकारी सत्यम गांधी यांनी सोमवारी  (ता.०६) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार घेताच थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. कुठे फाईल बंद खोलीत बसून आदेश नाहीत, कुठे एसी केबिनमधून सूचना नाहीत! थेट टेबल टू टेबल जाऊन प्रत्येक कर्मचाऱ्याशी संवाद साधला. कोण काय करतोय, कोण कुठे गायब आहे - सगळ्यांची खबर घेतली. त्यांच्या या एक्सीडेंटल व्हिजिट मुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं असं सांगतात! फिल्ड व्हिजिटला जायचं असेल तर हालचाल रजिस्टरमध्ये नोंद ठेवा. कधीही यावं, कधीही जावं - हा उद्योग आता खपवून घेणार नाही!" असंही त्यांनी बजावले आहे.

Advertisement

Sunera Pawar: 'माझ दुःख तळघरात कोंडलं', सुनेत्रा पवारांचा कंठ दाठला, शरद पवारांचे नाव घेत मोठं आवाहन

मुख्यालयाची झाडाझडती घेताना गांधी यांनी महिला बचत गटाद्वारे संचालित उपहारगृहाला भेट दिली. दरम्यान त्यांनी अल्पोपहार घेतला. येथील पदार्थांचे कौतुक करत त्यांनी याद्वारे महिला सक्षमीकरणाला  बळ देण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसले. शिवाय, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी अस्तित्वात असलेल्या स्कॅनर प्रणालीची त्यांनी प्रत्यक्षात माहिती घेतली. भिंतीवर असलेले स्कॅनर थेट मोबाईलमध्ये स्कॅन करून त्यांनी एकप्रकारे यंत्रणेच्या अंमलबजावणीच क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. त्यामुळे काहीकाळ प्रशासनात अस्वस्थता देखील, पसरल्याचे पाहायला मिळाले. 

मेळघाटात कोट्यवधींच्या योजना राबवल्या, पण आदिवासींच्या जगण्यात फरक काय पडला? हा खडा सवाल उपस्थित होताच गांधी स्पष्ट बोलले - "प्रत्येक योजनेचं प्रगती पुस्तक तपासू. कुठेही अनियमितता आढळली तर गंभीर कारवाई निश्चित, करू असेही त्यांनी  स्पष्ट केले. डहाणू आदिवासी क्षेत्रात काम केलेले गांधी मेळघाटच्या वास्तवाशी अनोळखी नाहीत - आणि त्यामुळेच त्यांचा हा इशारा भ्रष्टांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे!

शिक्षणाची क्रांती आणणार

गांधींनी जिल्हा परिषद शाळांसाठीही महत्त्वाकांक्षी संकल्प जाहीर केला. गणित-विज्ञान-इंग्रजीची आवड निर्माण करणार, ग्रामीण-आदिवासी मुलांना अखिल भारतीय सेवांपर्यंत नेणार, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आत्मविश्वास वाढवणार लोकाभिमुख प्रशासनाचं आव्हान स्वीकारलं! मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी हे गांधींचं पहिलं टार्गेट आहे. "पंचायत समिती स्तरावरच नागरिकांच्या समस्यांचं निराकरण व्हायला हवं" - हा त्यांचा स्पष्ट मंत्र आहे, शिवाय त्यांनी डिजिटल शिक्षण आणि उपक्रम यावरही पहिल्याच दिवशी लक्ष वेधलं.

Konkan Railway: वेटिंग लिस्टचे टेन्शन मिटले! मुंबई-मडगाव विशेष रेल्वेचे वेळापत्रक जाहीर;जाणून घ्या थांबे व वेळ