Konkan Railway: उन्हाळी सुट्यांचा हंगाम सुरू झाला असून चाकरमान्यांची पावले आता कोकणाकडे वळू लागली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेवर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते मडगाव स्टेशनदरम्यान अतिरिक्त साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वेने घेतला आहे.
प्रवासाचे वेळापत्रक आणि कालावधी
रेल्वेने जाहीर केल्यानुसार या विशेष गाड्यांच्या फेऱ्या 5 एप्रिल ते 7 जून 2026 या कालावधीत सुरू राहतील. ही गाडी दर रविवारी मुंबई आणि मडगाव या दोन्ही दिशांनी धावणार आहे.
- मुंबई ते मडगाव: ही ट्रेन प्रत्येक रविवारी मध्यरात्री 12.55 वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.15 वाजता मडगावला पोहोचेल.
- मडगाव ते मुंबई: परतीच्या प्रवासासाठी ही गाडी मडगाव येथून रविवारी दुपारी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) पहाटे 3.50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
प्रमुख थांबे आणि कोचची व्यवस्था
कोकणातील जास्तीत जास्त प्रवाशांना या सुविधेचा लाभ मिळावा, यासाठी ही गाडी महत्त्वाच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहे. यात दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या स्थानकांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष ट्रेनला एकूण 22 डबे जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना आरक्षण उपलब्ध होऊ शकेल.
(नक्की वाचा: Pune Metro: मेट्रो धावणार, पर्यावरणही जपणार! काय आहे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा ग्रीन पॅटर्न?)

Photo Credit: NDTV Marathi
आरक्षण प्रक्रियेला सुरुवातया विशेष ट्रेनचे आरक्षण 1 एप्रिलपासून सुरू झाले आहे. सुट्यांच्या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच फुल झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. पण या विशेष गाडीमुळे आता प्रवाशांना वेटिंग लिस्टच्या त्रासातून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world