Akola : नाफेडच्या सोयाबीन खरेदीत सुमारे 63 लाखांचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील 'अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी'च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Akola News : 'अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी'च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या घोटाळ्यात जितक्या रुपयांची खरेदी केली तितका सोयाबीन गोदामात आढळून आला नाही. म्हणजे कंपनीने 19723.92 क्विंटल सोयाबीन खरेदी केले, मात्र प्रत्यक्षात 'नाफेड'च्या (NAFED) गोदामात केवळ 18426.92 क्विंटल माल जमा झाला. 1297 क्विंटल सोयाबीनची फक्त कागदोपत्री असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये सुमारे 63 लाख 44 हजार 924 रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात कंपनीच्या संचालकांसह 12 जणांविरुद्ध आर्थिक व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
  
अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथील सोयाबीन खरेदी घोटाळा सध्या राज्यभरात गाजतोय. यात खरेदी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेली 'अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी' सध्या अडचणीत आली आहे. या कंपनीने 15 फेब्रुवारीनंतर एकूण 19723.92 क्विंटल सोयाबीन खरेदी केले. मात्र 'नाफेड'च्या (NAFED) गोदामात केवळ 18426.92 क्विंटल माल जमा झाला. उर्वरित 1297 क्विंटल सोयाबीनची फक्त कागदोपत्री ऑनलाईन खरेदी झाल्याचं समोर आलं आहे.  मात्र याबाबत कंपनीकडून वेगळंच म्हणणं आहे. कंपनीला बदनाम करण्यासाठी काही व्यापारी, पणन विभागाचे काही अधिकारी आणि कंपनीतील काही भ्रष्ट प्रवृत्तींनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप कंपनीनं केला आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन

कंपनीने सोयाबीन खरेदीसाठी नियुक्त केलेल्या व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरशी काही व्यापाऱ्यांसह नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप कंपनीच्या संचालक मंडळाने केलाय. यात शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी, व्यवस्थापक आणि कॉम्प्युटर ऑपरेटरने सोयाबीन खरेदीच्या खोट्या नोंदी केल्यात. हा प्रकार लक्षात आल्याने कंपनीच्या वतीने 24 फेब्रुवारी, 4 मार्चला जिल्हा पणन अधिकाऱ्यांना या प्रकाराची लेखी तक्रार करण्यात आलीय. तर 11 तारखेला शेतकरी कंपनीने याप्रकरणात दोषींवर कारवाईसाठी पोलीस तक्रारही केली आहे.

Advertisement