शरद पवारांचा नवा डाव; नगरमध्ये अजित पवार आणि भाजपचं टेन्शन वाढलं

शरद पवार यांनी अहमदनगरच्या अकोले येथील सभेमध्ये नवीन डाव टाकला आहे. शरद पवारांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव मधुकर पिचड  यांचं देखील टेंशन वाढवलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे शरद पवारांची आज सभा पार पडली. तिथे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्याविरोधात आपल्या उमेदवाराची शरद पवारांनी जवळपास घोषणा केली आहे.  

शरद पवार यांनी अहमदनगरच्या अकोले येथील सभेमध्ये नवीन डाव टाकला आहे. शरद पवारांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव मधुकर पिचड  यांचं देखील टेंशन वाढवलं आहे. अकोले विधानसभेत अमित भांगरे यांना बळ द्या, असं म्हणत शरद पवारांनी एकप्रकारे आपला उमेदवारच घोषित केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांनी येथे बोलताना म्हटलं की, विधानसभेत पहिल्यांदा गेलो तेव्हा आदिवासींचे प्रश्न तळमळीने मांडणारे यशवंतराव भांगरे तिथे बघितले. त्यानंतर ही जबाबदारी अशोकराव भांगरे यांनी घेतली. दुर्देवाने ते आपल्यातून लवकर निघून गेले. नव्या पिढीने अकोलेचे प्रश्न कसे सुटतील याची जबाबदारी घेतली आहे. अशोकरावांनी एकच मागणी केली होती की माझ्या मुलावर लक्ष ठेवा. त्यानंतर शरद पवार यांनी अमित भांगरे यांना विधानसभा निवडणुकीत बळ द्या असं आवाहन केलं आहे. 

(नक्की वाचा - पूजा खेडकरांवर UPSC ची सर्वात मोठी कारवाई; गुन्हा दाखल, नोकरीवरही टांगती तलवार)

राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचं

लोकसभा निवडणुकीत पाच वर्षांपूर्वी काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत 48 पैकी 31 जागा जिंकल्या याचा अभिमान आहे. एक नवी दिशा देशाला दाखवली आहे. 70 दिवसांनी विधानसभेची निवडणूक आहे, त्याच्या तयारीला लागा. महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचं आहे, त्यासाठी तुमची शक्ती हवी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

Advertisement

(नक्की वाचा -  ठरलं तर मग! जागांसाठी शिवसेना आक्रमक, मित्रपक्षांचे टेन्शन वाढले)

शेती शेतकरी या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. शेतीमालाला कुणी जास्त मागत नाही. किमान उत्पादन खर्च द्या ही मागणी आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध धंदा आहे, त्या दुधाला रास्त किंमत देण्याची आज गरज आहे. नाशिक, नगर, सोलापूर, सातारा येथील शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. कांद्याला रास्त भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी देखील शरद पवार यांनी केली.

Topics mentioned in this article