OBC Mandal Yatra: ओबीसींच्या जागरासाठी 'मंडल यात्रा', भाजपच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची फिल्डिंग

राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनजागृती मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. नागपूर येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रविण मुधोळकर, नागपूर:  राज्याच्या राजकारणात आता महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीत ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्लॅन राष्ट्रवादी शरद पवार गटाने आखला आहे. यासाठी राज्यभरात राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील मंडल आयोग यात्रा काढण्यात येणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी मतदार आकर्षित करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नवी रणनिती आखली आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी जनजागृती मंडल यात्रा यात्रा काढण्यात येणार आहे. नागपूर येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. 

Congress News : काँग्रेस पक्षात इन्कमिंगला सुरुवात; शरद पवारांना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे नेते शरद पवार ९ ऑगस्टला नागपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पक्षाचे नेते सलील देशमुख यांनी दिली. या दौऱ्यात पवार ओबीसी सेलच्या ओबीसी जनजागृती मंडल यात्रेला हिरवा कंदील दाखवणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणाऱ्या या यात्रेद्वारे, पवारांनी मुख्यमंत्री असताना देशात प्रथमच राबवलेली मंडल अंमलबजावणी जनतेच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न होणार आहे असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 

मंडलाच्या विरोधात कमंडल यात्रा काढून तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे सरकार पाडणाऱ्यांचा इतिहास लोकांना माहीत असणे गरजेचे आहे. ओबीसीचे खरे जनक कोण आणि शत्रू कोण, हे जनतेला समजायलाच हवे,” असे सलील देशमुख यावेळी म्हणाले. या दौऱ्यात शरद पवार विदर्भातीलपदाधिकाऱ्यांसोबत  बैठक घेणार आहेत. कवी, लेखक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार, तर अखेर पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडणार आहेत.

Advertisement

आमदारकी नाही, पण लोगो मिळाला; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कारनाम्याची जिल्हाभर चर्चा

Topics mentioned in this article