जाहिरात

Solapur News: आमदारकी नाही, पण लोगो मिळाला; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कारनाम्याची जिल्हाभर चर्चा

महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेतील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर 'आमदार' असा लोगो लावण्याचा अधिकार आहे.

Solapur News: आमदारकी नाही, पण लोगो मिळाला; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कारनाम्याची जिल्हाभर चर्चा

सौरभ वाघमारे, सोलापूर

सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षांचा एक 'कारनामा' चर्चेचा विषय बनला आहे. आमदार नसतानाही त्यांनी आपल्या गाडीवर 'आमदार' असा लोगो लावला असल्याचे समोर आले आहे. उमेश पाटील असे या जिल्हाध्यक्षांचे नाव असून, त्यांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उमेश पाटील यांची एम एच 04 एच डी 5565 क्रमांकाची गाडी सोलापुरातील विश्रामगृह येथे उभी असताना अनेकांनी ती पाहिली. या गाडीच्या समोरच्या बाजूला 'आमदार' असा लोगो स्पष्टपणे लावलेला दिसून आला. ही बाब लगेचच चर्चेचा विषय बनली.

(नक्की वाचा - MNS News: '15 दिवसात डान्सबार बंद करा नाहीत तर...', मनसेचा थेट इशारा)

नियम काय सांगतात?

महाराष्ट्रात विधानसभेतील 288 सदस्य आणि विधान परिषदेतील 78 सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर 'आमदार' असा लोगो लावण्याचा अधिकार आहे. हा अधिकार फक्त अधिकृत आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनाच असतो. मात्र, उमेश पाटील हे आमदार नसतानाही त्यांनी हा लोगो वापरला, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

(नक्की वाचा- Sunjay kapur : संजय कपूरची सावत्र मुलगी सफीराने आडनाव बदललं; वडिलांच्या 30 हजार कोटींच्या संतत्तीत तिला काय मिळणार?))

पाटील यांनी स्वतःच गाडीवर हा लोगो लावून आपण आमदार झाल्यासारखे वागत आहेत, अशी टिप्पणी आता सोलापूरमध्ये सुरू आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com