- अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने पवार कुटुंबाला मोठा आघात बसला असून शरद पवार यांना देखील धक्का बसला आहे
- शरद पवारांनी माध्यमांसमोर सांगितले की हा मृत्यू राजकारणाचा भाग नाही तर एक निव्वळ अपघात आहे
- मृत्यूच्या आधी अपघात की घातपात यावर चर्चाअसली तरी शरद पवारांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. पवार कुटुंबासाठी हा सर्वात मोठा आघात आहे. शरद पवारांना ही बातमी समजल्यानंतर ते तातडीने बारामतीकडे आले होते. त्यांनी जिथे अजित पवारांचे पार्थिव ठेवले होते, त्या ठिकाणी भेट ही दिली होती. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान इथे ही गेले होते. अजित पवारांचा अपघात की घातपात याची चर्चा ही सुरू झाली होती. त्यांच्या निधनावर कुणाचा ही विश्वास बसत नव्हता. अशा वेळी शरद पवार हे पुढे आले. त्यांनी यावेळी मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार संध्याकाळी माध्यमांसमोर आले. ते दिवसभर काहीच बोलले नाहीत. त्यांच्यासाठी अजित पवारांचा मृत्यू हा मोठा धक्का होता. ज्या वेळी ते माध्यमांसमोर आले त्यावेळी ते पुर्ण पणे खचलेले दिसले. त्यांना सुरूवातील बोलण्यास ही त्रास होत होता. त्यांच्या तोंडून शब्द ही फुटत नव्हेत. डोळ्यात आश्रू होते. आवाज थरथरत होता. त्यावरूनच पवारांसाठी हा किती मोठा धक्का होता हे समजू शकत होतं. प्रत्येक वेळी खंबिर पणे समोरे जाणारे शरद पवार हे पहिल्यांदाच खचल्या सारखे दिसले.
नक्की वाचा - Ajit Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार?, 'या' आहेत 5 शक्यता
हा कुटुंबासाठी मोठा धक्का आहे हे त्यांचे पहिले शब्द होते. नुकसान झालं ते भरून निघणारं नाही. हे कोणाच्या हातात नसतं. हा निव्वळ अपघात आहे. राजकारण नाही. असं म्हणत शरद पवारांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. ते माध्यमा समोर रडू लागले. येवढं निवेदन करून ते थांबले. सकाळपासून अजित पवारांचा अपघात की घातपात याची चर्चा सुरू होती. या चर्चेला त्यांना पूर्ण विराम दिला आहे. शिवाय हा घातपात नसून हा एक अपघात असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
अजित पवारांचा मृत्यू झाला त्यावेळी शरद पवार हे मुंबईत होते. त्यांना ही बातमी समजली त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तातडीने ते बारामतीकडे निघाले. हेलिकॉप्टरने बारामतीत ही पोहोचले. त्यांच्यासाठी हा मोठा कठीण काळ होता. परिवारातील सर्वात मोठे या नात्याने त्यांना सर्वांनाच आधार द्यायाचा होता. पण शरद पवारांनाही आधारीची गरज होती असचं त्यांच्या पहिल्या प्रतिक्रीयेवरून दिसून येतं. ज्याला आपल्या तालमीत घडवलं त्याचाच मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहावा लागला असचं काहीस शरद पवारांसोबत घडलं.