Crime News: शिर्डी हादरली! तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, कर्मचाऱ्यांनी रात्री घडलं ते सविस्तर सांगितलं

Shirdi Crime News: शिर्डीतील हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीममध्ये मध्यप्रदेशातील आस्था सिंग या तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, शिर्डी

Shirdi Crime News: तीर्थक्षेत्र शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आस्था सिंग असे मृत तरुणीचे नाव असून ती मध्यप्रदेशातील सतना येथील रहिवासी आहे. निमगाव शिवारातील 'हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम'मध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.

नक्की काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, आस्था सिंग आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी बुधवारी हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी आस्था ज्या खोलीत होती तिथून मोठ्या प्रमाणात आरडाओरडा आणि भांडणाचा आवाज येत होता. आज सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना आस्थाचा मृतदेह खोलीत संशयास्पद अवस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने याची माहिती शिर्डी पोलिसांना दिली.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News: संतापजनक! भाड्यावरून वाद, कॅब चालकाने आयटी इंजिनिअरचे बोट चावून तोडले)

एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही व्यक्ती आस्थासोबतच हॉटेलमध्ये आली होती का, याचा तपास सुरू आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, रात्री नेमके कोण-कोण त्या खोलीत गेले होते, याची पडताळणी पोलीस करत आहेत.

(नक्की वाचा-  रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी अन् 1 लाखाचे बिल 57 हजारांवर, सगळ्यांना जागृत करणारी पोस्ट)

घातपाताची शक्यता?

मृतदेहावर जखमांच्या खुणा आहेत का किंवा हे आत्महत्येचे प्रकरण आहे की घातपाताचे, हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, रात्री झालेला आरडाओरडा पाहता यामागे काहीतरी गंभीर वाद असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
 

Topics mentioned in this article