साईबाबांचे भक्त केवळ महाराष्ट्रात किंवा भारतभर नाहीत, तर ते जगभर पसरले आहे. त्यांची साईंवरची भक्ती ही मोठी आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात ते कुठे ही असेल तरी वर्षातून ते एकदा तरी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. अनेक भक्त साईंच्या चरणी आपल्या कुवती प्रमाणे दान करतात. तर काही भक्त ऐवढं मोठं दान करतात की त्याची चर्चा देशभर होते. असे अनेक भक्त मोठी दान करून गेले आहेत. दक्षिण भारतातल्या भक्तांची याबाबत नेहमीच चर्चा होते. पण यावेळी परदेशातील एका भक्ताने दिलेल्या दानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितेश वर्मा हे मुळचे पंजाबचे रहीवाशी आहेत. पण ते सध्या दुबईत स्थायिक झाले आहेत. त्यांच्या तिथे मोठा व्यवसाय आहे. ते साईबाबांचे मोठे भक्त आहेत. दर वर्षी ते न विसरता सहकुटुंब साई चरणी येत असतात. 2012 पासून गेली 12 वर्ष ते शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. त्यांची साईबाबांवर निस्सीम भक्ती आहे. आज आपण जे काही आहे ते साईबाबांच्या कृपेमुळे आहोत असा त्यांचा मानस आहे.
त्यामुळे यावेळी त्यांनी मोठं दान साईबाबांच्या चरणी अर्पण केलं आहे. त्यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल पन्नास लाखांचं दान केलं आहे. कोणी सोनं, चांदी, अशा स्वरुपात मोठं दान देतं. पण नितेश वर्मा यांनी पन्नास लाख रूपये देवू केले आहेत. त्यातून आपल्याला समाधान मिळाल्याचं ही त्यांनी सांगितलं. साईबाबांकडे जे मागीतल होतं, त्या पेक्षा शंभर पटीनं जास्त दिल्यानं हे दान साईंच्या झोळीत टाकलय असं ही ते म्हणाले. साई चरणी नतमस्तक होत आपलं कार्य सिद्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. साई संस्थानच्यावतीनं दानशूर भाविकांचा बाबांची मुर्ती देत सत्कार करण्यात आलाय.