Shirdi News: साईंच्या शिर्डीत चाललंय काय? संस्थांच्या पार्कींगमध्येच नशेखोरांचा अड्डा अन् रात्री भरतो...

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा साई बाबा संस्थानच्या ताब्यात असून याठिकाणी गर्दीच्या काळात पार्किंगची व्यवस्था केली जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins
शिर्डी:

सुनिल दवंगे

शिर्डी म्हटलं की डोळ्या समोर येतं ते साईबाबा. जगभरातून या साईनगरीत भावीक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. जगाच्या नकाशावर शिर्डीचे महत्व वेगळे आहे. असं असता या शहरात काही गोष्टीमुळे शहराचे नाव खराब होत आहे. काही दिवसांपूर्व या शहरात दिवसाढवळ्या शरिर विक्रीचा व्यवसाय होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तो विषय संपत नाही तोच आता पुन्हा एका गंभीर विषयाने डोकं काढलं आहे. तो म्हणजे शहराला नशेखोरांनी वेढा घातला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी दुर्लक्षित असलेल्या एका वाहनतळामध्ये गुर्दुल्यांनी चक्क गांजाची शेती केल्याचं उघडकीस आलं आहे. नवीन पिंपळवाडी रोड वरील पार्किंगमध्ये गवताचा आडोसा करत मोठ्या प्रमाणात गांजीची चार ते पाच फुटांची झाडं मिळून आली आहेत. एका स्थानिकाने शिर्डी नगरपरिषदेच्या एमएसएफ रक्षकांना याची माहीती दिल्यानंतर त्यांनी याठीकाणी असलेली गांजाची झाडं उपटून जप्त केली आहेत.

नक्की वाचा - Ladaki bahin Yojana: आता 'या' संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध, दिवाळीचा हाफ्ता कधी जमा होणार?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा साई बाबा संस्थानच्या ताब्यात असून याठिकाणी गर्दीच्या काळात पार्किंगची व्यवस्था केली जाते. तर रात्रीच्या वेळी ही जागा नशेखोरांचा अड्डा बनत चालली आहे. त्यांनी येथे चोरीछुपे गांजाची झाडे लावल्याचं सांगीतलं जात आहे. सध्या निदर्शनास येणारी गांजाची झाडे उपटून टाकण्यात आली असून अधिक झाडाझडती घेतली तर आणखी गांजाची झाडे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मुळातच ही कारवाई करताना शिर्डी पोलीसांनी पंचनामा करत तपास करणं गरजेच होतं, पण तसं झालेलं नाही त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.  

नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल

दरम्यान नेमंक ही झाडं कोणी लावली. आणखी इतर कुठे कुठे अशा प्रकारची झाड लावली गेली आहेत का, यावर कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र पोलीस घटनास्थळी फिरकलेच नसल्यानं शिर्डी नशेखोरांचा अड्डा होत असल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. शिर्डीचं वाहनतळ आहे की नशेखोरांचा अड्डा असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.  गवताचा सहारा घेत नशेखोरांकडून गाजांची लागवड केल्याचं ही आता उघड झालं आहे. दिवसा तो दिवस रात्रीही इथं नशेखोरांचा अड्डा भरत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. 

Advertisement