मराठी माणसाची कल्पना, शिर्डीमध्ये नवा आविष्कार! दर्शनाला जाल तर 'हे' नक्की पाहा

शिर्डीमध्ये एका मराठी माणसाने विदेशातील थीम पार्क्सचा (Theme Parks) अभ्यास करून, साईबाबांच्या जीवनावर आधारित एका अनोख्या 'श्री साईबाबा थीम पार्क'ची (Shri Sai Baba Theme Park) उभारणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनिल दवंगे, शिर्डी

Shri Sai Baba Theme Park Shirdi: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या (Shirdi Sai Baba) दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आता केवळ मंदिराचे दर्शन नव्हे, तर बाबांच्या जीवनचरित्राचा (Life Story) जवळून अनुभव घेता येणार आहे. शिर्डीमध्ये एका मराठी माणसाने विदेशातील थीम पार्क्सचा (Theme Parks) अभ्यास करून, साईबाबांच्या जीवनावर आधारित एका अनोख्या 'श्री साईबाबा थीम पार्क'ची (Shri Sai Baba Theme Park) उभारणी केली आहे. Shirdi Sai Mama Temple News 

51 प्रसंगांचे दर्शन

साई मंदिराला लागून असलेल्या साई कॉम्प्लेक्स (Sai Complex) परिसरात हा थीम पार्क साकारण्यात आला आहे. कलाकार हेमंत वाणी यांनी या उपक्रमाला मूर्त रूप दिले आहे. या थीम पार्कमध्ये साईबाबांच्या जीवन प्रवासातील आणि चमत्कारांशी संबंधित ५१ महत्त्वपूर्ण प्रसंगांचे (51 Incidents) अत्यंत कलात्मक पद्धतीने दर्शन घडवण्यात आले आहे.

Shirdi News: साईंच्या शिर्डीत चाललंय काय? संस्थांच्या पार्कींगमध्येच नशेखोरांचा अड्डा अन् रात्री भरतो...

जीवन पद्धतीचा परिचय

या थीम पार्कच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, शिर्डीला भेट देणाऱ्या भाविकांना केवळ साईंचे दर्शन न घेता, साईबाबांची जीवन पद्धती आणि त्यांचे आदर्श यांचा परिचय व्हावा. या ५१ प्रसंगांच्या माध्यमातून बाबांच्या साधेपणाचे, चमत्कारांचे आणि त्यांच्या शिकवणीचे दर्शन घडवले जात आहे.

सध्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हा थीम पार्क चांगलाच पसंतीस (Popular) पडत आहे. कलाकार हेमंत वाणी यांनी स्पष्ट केले आहे की, काळानुसार या थीम पार्कमध्ये बदल करून, अधिक कल्पकता (Creativity) वापरत सुधारणा केल्या जातील. मराठी मातीतील एका कलाकाराने परदेशी संकल्पनांचा अभ्यास करून महाराष्ट्रातील या पवित्र भूमीत साकारलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.

Advertisement

नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल