जाहिरात

Shirdi News: साई चरणी सुर्यकुमार यादव लीन, टी-20 मालिकेपूर्वी साईबाबांकडे काय मागितलं?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

Shirdi News: साई चरणी सुर्यकुमार यादव लीन, टी-20 मालिकेपूर्वी साईबाबांकडे काय मागितलं?
शिर्डी:

सुनिल दवंगे

साई चरणी जगभरातून भक्ती लीन होत असतात. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत आणि सर्व सामान्यां पासून अती श्रीमंतापर्यंत सर्वच जण मोठ्या भक्तीभावाने शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. यात काही खेळाडूंचाही समावेश आहेत. त्या पैकीच एक  टीम इंडियाच्या टी-20 संघाचा कॅप्टन सुर्यकुमार यादव आहे. त्याने सहपत्नी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. तो कोणत्याही मोठ्या दौऱ्यावर जाण्या आधी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला नक्की येतो. यावेळीही तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्या आधी त्याने साईबाबांचे दर्शन घेतले.  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण मालिकेपूर्वी भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांने पत्नी दिविशा शेट्टीसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दिवाळीच्या निमित्तानं दाम्पत्य शिर्डीत आले होते. यावेळी हे दोघे ही साईबाबांच्या आरतीला उपस्थित होते. यावेळी सूर्यकुमार यादव याने साईबाबांच्या समाधीवर केसरी रंगाची शॉल अर्पण केली. 

नक्की वाचा - Bank Holidays: सोमवारी बँका सुरू राहणार की बंद? जाणून घ्या कोणत्या दिवशी आहेत सुट्ट्या

साई समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्याने द्वारकामाई आणि गुरुस्थानाचंही दर्शन घेतलं. साईदर्शनानंतर साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या परिवाराचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार केला. या आध्यात्मिक भेटीनंतर सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय टी-20 संघाकडून उत्साहवर्धक कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही मालिका टीम इंडिया नक्की जिंकेल असा विश्वास सुर्यकुमार यादव याने यावेळी व्यक्त केला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com