Shirish More : 32 लाखांसाठी शिरीष महाराजांनी स्वत:ला संपवलं, उपमुख्यमंत्री मोरे कुटुंबासाठी धावले!

तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं. अवघे 32 वय असणाऱ्या शिरीष महाराज यांचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shirish More Death : तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवलं. अवघे 32 वय असणाऱ्या शिरीष महाराज यांचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं होतं. मात्र आर्थिक विवंचना इतकी मोठी झाली की त्यांना जीव देणं सोपं वाटलं. शिरीष मोरे यांच्यावर 32 लाखांचं कर्ज होतं. कर्ज फेडता येत नसल्याने त्यांनी राहत्या घरात पंख्याच्या खुंटीला उपरण्याने गळफास घेतला. या घटनेनंतर राज्य हादरलं. मोरे कुटुंबासह देहूतील गावकऱ्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरीष महाराज यांच्यावर कर्ज कमी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अख्ख आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी शिंदेंनी हे पाऊल उचललं. आमदार विजय शिवतारेंनी महाराजांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली. 5 फेब्रुवारीला देहूतील राहत्या घरी शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली अन वारकरी संप्रदायात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली अन् त्यांनी ही याबाबत दुःख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं आहे. आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली अन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलंय. 

Advertisement

नक्की वाचा - आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त...', शिरीष महाराजांचं होणाऱ्या बायकोसाठी शेवटचं पत्र, वाचताना डोळे पाणावतील!

संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हभप शिरीष महाराज मोरे (वय 32) यांनी राहत्या घरात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. 14 दिवसांवर त्यांचं लग्न होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. नवी नवरी संसाराची स्वप्न रंगवत होती. मात्र अचानक शिरीष मोरे यांनी आपल्या आयुष्याचा असा शेवट केला. यामुळे मोरे कुटुंबासह देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्राथमिक तपासानुसार शिरीष मोरे यांना आर्थिक चणचण होती. त्यांच्यावर बरंच कर्ज होतं. काही वृत्तानुसार त्यांच्यावर 32 लाखांचं कर्ज होतं. यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. मृत्यूपूर्वी शिरीष मोरे यांनी अनेक पत्र लिहून ठेवली होती. यात त्यांनी कोणाकडून किती कर्ज घेतलं याचाही उल्लेख आहे. शिरीष यांनी होणारी पत्नी, मित्र, आई-वडील यांच्यासाठी (Shirish Maharaj 32 Lakh Loan) चार पत्र लिहून ठेवली होती. ती पत्र समोर आली आहेत.