Political News : ठाकरे गटाला कोकणात खिंडार? उद्धव ठाकरेंचा शिलेदार भाजपात प्रवेश करणार?

Shivsena UBT News : गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार अशी चर्चा सुरु होती. विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर राजन साळवी यांनी पराभवाचं खापर फोडलं होतं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी

शिवसेना ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा कोकणातील महत्त्वाचा शिलेदार साथ उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं जवळपासा निश्चित झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याची चर्चा असललेल्या शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते, माजी आमदार राजन साळवी यांचं अखेर ठरलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पौष महिना संपल्याने आता येत्या 2 ते 3 दिवसांत साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर साळवी यांचा भाजप प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

( नक्की वाचा :  Ajit Pawar : दमानियांच्या पुराव्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार? अजित पवारांनी दिलं उत्तर )

गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार अशी चर्चा सुरु होती. विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर राजन साळवी यांनी पराभवाचं खापर फोडलं होतं. 

(नक्की वाचा-  अजित पवारांच्या समोरच राडा! धस, मुंडे सर्वांसमोर भिडले, बीड DPDC बैठक गाजली)

यानंतर राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. मात्र नाराज राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करण्याचं ठरवलं आहे. राजन साळवी यांच्या पक्ष सोडल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का मानला जात आहे. 

Advertisement