जाहिरात

BEED DPDC MEETING: अजित पवारांच्या समोरच राडा! धस, मुंडे सर्वांसमोर भिडले, बीड DPDC बैठक गाजली

बीड जिल्ह्यात सध्या सुरेश धस यांच्या अजेंड्यावर परळीतील राखेची अवैध वाहतूक, बोगस बिलं काढून 73 कोटी लाटले, हे मुद्दे अजेंड्यावर आहेत.

BEED DPDC MEETING: अजित पवारांच्या समोरच राडा! धस, मुंडे सर्वांसमोर भिडले, बीड DPDC बैठक गाजली
बीड:

भाजप आमदार सुरेश धस आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. त्यात बोगस बीलांचे प्रकरण DPDC बैठकीच्या आधीच धस यांनी काढलं. या बैठकीला पालकमंत्री अजित पवार येणार होते. त्यामुळे डीपीडीसीची बैठक वादळी ठरणार हे निश्चित होते. त्यामुळे बैठकीच्या आधीत बीडचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होत. शिवाय अपेक्षे प्रमाणे ही बैठक वादळी ठरली. शिवाय अजित पवारांसमोरच राडा झाल्याचे माहिती समोर येत आहे. या बैठकीत धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे एकमेकांना भिडल्याचंही समोर आलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची पहिली बैठक म्हणजेच बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला दीड महिन्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. पण याच बैठकीत अजित पवारांसमोरच दहशतीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत खासदार बजरंग सोनवणे यांनी माजी पालकमंत्र्याची दहशत असा उल्लेख केला. त्यावरून वादाला सुरुवात झाली. 

ट्रेंडिंग बातमी -  MNS Melava: निकालानंतर सन्नाटा, निवडणुका न लढलेल्या बऱ्या.. अखेर राज ठाकरे गरजले!

बीड जिल्ह्यातील देशमुख हत्या प्रकरण, खंडणी प्रकरणासह गुन्हेगारीवर या बैठकीत चर्चा सुरू होती. त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे. खासदार सोनवणे यांनी आधीच दहशतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात बीडची बदनामीचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर सुरेश धस यांनी आक्षेप घेत बैठकीतच उठले. बीडची बदनामी कुणी केली असा थेट प्रश्न त्यांनी धनंजय मुंडेंनाच केला. यावेळी अजित पवारांनी मध्यस्थी केली. त्यानंतर ही बैठक संपली. 

ट्रेंडिंग बातमी - MNS Melava: ED ला घाबरुन मोदींना पाठिंबा? राज ठाकरेंनी छत्रपतींची शपथ घेऊन 'ती' गोष्ट सांगितली; म्हणाले...

 बैठकीनंतर सुरेश धस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. डीपीडीसी बैठकीत बाचाबाची झाली. पण ती किरकोळ होती. तसं होत असतं असही त्यांनी स्पष्ट केलं. जे झालं ते किरकोळ आहे. त्याला बाचाबाची म्हणता येणार नाही असं धस म्हणाले. आमचं गुद्द्याचं भांडण नाही आमचं मुद्द्याचं भांडण आहे असंही त्यांनी सांगितलं. बैठकीत भांडण झालं असं कुठेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत का? असा प्रति प्रश्नही त्यांनी यावेळी पत्रकारांना केला. 

ट्रेंडिंग बातमी - Dhule News: अनधिकृत कॅफेत पडद्याआड तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, पोलीस पोहोचले अन्...

सुरेश धस यांनी बुधवारी धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. रस्ते कंत्राटाची बोगस बिलं काढून 73 कोटी लाटल्याचा आरोप सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंवर केला होता. या आरोपांचा पेनड्राईव्ह देखील सुरेश धस यांनी अजित पवारांना दिला आहे. शिवाय याबाबतची तक्रारही आपण करणार असल्याचं धस म्हणाले. आपण ही बाब उघड केल्यानंतर जवळपास  500 लोक कोमात गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar: बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित पवार गरजले! नेत्यांना सज्जड दम, खंडणीखोर, अधिकाऱ्यांना वॉर्निंग

तर या विषयी काही माहित नाही अशी प्रतिक्रीया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तर धस अजित पवारांना कागदपत्र देतील ते त्यात काय तथ्य आहेहे तपासतील असं बैठकीनंतर पंकजा मुंडे म्हणाल्या. बीड जिल्ह्यात सध्या सुरेश धस यांच्या अजेंड्यावर परळीतील राखेची अवैध वाहतूक, बोगस बिलं काढून 73 कोटी लाटले, अनेक वर्षे अधिकाऱ्यांची न झालेली बदली, बिंदू नामावलीप्रमाणे अधिकाऱ्यांची न झालेल्या नियुक्त्या, पोलिसांकडूनच वाळूचा धंदा हे मुद्दे अजेंड्यावर आहेत. त्याचेच पडसाद आजच्या बैठकीतही उमटले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com