शरद सातपुते, सांगली
शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती कमी होण्याचं नाव घेत नाही. सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह ठाकरे गट शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह तालुका प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रामगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे.
(नक्की वाचा - 'कुणाल कामराचा मुंबईतच काय महाराष्ट्रात शो होवू देणार नाही' राहुल कनाल यांचा इशारा)
यावेळी संजय विभूतेंसह सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
(नक्की वाचा- Shivsena Rada: शिवसेना शिंदे गटात पुन्हा जोरदार राडा, पोलीसांसमोरच फ्री स्टाईल हाणामारी)
ठाकरे गट शिवसेनेमध्ये योग्य सन्मान मिळत नाही. त्याचबरोबर पक्ष वाढीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना संजय विभूते यांनी व्यक्त केली आहे. तर एकाच वेळी जिल्हा प्रमुखांसह, तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांचा शिवसेनेला सोडचिट्टी देण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.