Maharashtra Politics: आवाज कुणाचा? वर्धापनदिनी शिंदेंचा ठाकरेंना दे धक्का; बड्या नेत्यांचे पक्षप्रवेश

Shivsena Anniversary: विशेष म्हणजे माजी नगरसेवक अजित भंडारी काल झालेल्या मातोश्री वरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shivsena 59th Anniversary: आज शिवसेनेचा 59 वा वर्धापनदिन.. या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट अन् शिंदे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापनदिन षणमुखानंद हॉलमध्ये होणार आहे तर वरळीमध्ये शिंदे गटाचा वर्धापनदिन सोहळा पार पडेल. एकीकडे या वर्धापनदिनाकडे सर्वांचे लक्ष असतानाच शिंदे गटाने मात्र वर्धापनदिनीही ठाकरे गटाला जोर का झटका दिला आहे.

Rashmi Thackeray : उद्धव नाही रश्मी ठाकरे पक्ष चालवतात! पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आरोप

शिवसेनेच्या वर्धापन दिनादिवशी शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेत शिंदे गटात पक्षप्रवेशाची मालिका सुरूच असून मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मुंबईतील ठाकरेंच्या सेनेतील माजी नगरसेवक अजित भंडारी  आणि शाखाप्रमुख संजय जंगम आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे माजी नगरसेवक अजित भंडारी काल झालेल्या मातोश्री वरील माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर चांदीवली येथील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विजयेंद्र शिंदे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

नाशिकमध्ये (Nashik) गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी, माजी आमदार तसेच माजी नगरसेवकांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे आज शिवसेनेचा वर्धापन दिन नाशिक मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन अनेक प्रभागांमध्ये करण्यात आला आहे जिल्हाप्रमुख महानगर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडत आहेत. 

नक्की वाचा:  हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी! वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना डिवचले

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या...तसेच उद्धव साहेब राज साहेब एकत्र या अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

Advertisement