ठाकरेंच्या शिवसेनेत पैसे घेऊन पदे विकली जातात! उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयावर आरोप

भाजपच्या नेत्यांनीही शिवसेना नेत्यांच्या सुरात सूर मिसळत आरोप केले आहेत. शिवसेना आमदार संजय शिरसाट,माजी खासदार संजय निरुपम यांच्यासह भाजप नेते आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या या निकटवर्तीयावर आरोप केले आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

अक्षय कुडकेलवार

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी आरोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.  शिवसेनेने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीवर शिवसेना नेत्यांनी आरोप केलेत. भाजपच्या नेत्यांनीही शिवसेना नेत्यांच्या सुरात सूर मिसळत आरोप केले आहेत. शिवसेना आमदार संजय शिरसाट,माजी खासदार संजय निरुपम यांच्यासह भाजप नेते आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या या निकटवर्तीयावर आरोप केले आहेत. 

हे ही वाचा : धानोरकर, वडेट्टीवार वादामुळे काँग्रेस नेते अलर्ट झाले, वाद मिटवण्यासाठी दिल्लीत बैठक

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बहुतांश लोकांनी शिवसेनेत तिकिटे विकली जात असल्याचा आरोप केला होता. नारायण राणे, राज ठाकरे यांनीही हे आरोप केले होते.  राज ठाकरेंनी तर शिवसेना सोडतेवेळीच शिवसेनेमध्ये पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते असा आरोप केला होता. हे सगळे उद्धव ठाकरे , असे आरोप करूनच राज ठाकरे देखील बाहेर पडले होते. या सर्व नेत्यांनी आरोप करताना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते.  

हे ही वाचा : VIDEO : आनंदाश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर उधळल्या नोटा, नेमकं काय घडलं?

संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक रवी म्हात्रे आणि माजी खासदार विनायक राऊत या दोघांवर टीका केली. शिरसाट यांनी आरोप केला की, विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. 'पैसे आणा आणि पदे घ्या' ही कार्यपद्धती सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला आहे.  शिरसाटांप्रमाणेच माजी खासदार संजय निरूपम यांनीही या दोघांवर आरोप केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी विनायक राऊत आणि रवी म्हात्रे यांच्यावर आरोप करताना म्हटले की, हे दोघे  पूर्वीपासूनच या साठी कुप्रिसद्ध आहेत.  ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महिला पदाधिकारी देखील पैसे घेत असल्याचा आरोप शिरसाटांनी केला.  शिरसाट यांनी यावेळी कोणाचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचे बोलले जाते.  

Topics mentioned in this article