Mumbai Dadar Station Viral Video: मुंबईकरांचं आयुष्य म्हणजे सततची धावपळ, गडबड अन् घाई... कधी लोकल पकडण्यासाठी पळापळ तर कधी ऑफिसला वेळेत पोहोचण्याची लगबग.. अशावेळी अनेकजण स्टेशनवर, स्टेशनच्या बाहेर असलेल्या गाड्यांवर नाश्ता करतात, जेवण घेतात. मात्र असे बाहेरचे खाणे आरोग्यास हानीकारक ठरु शकते. असाच एक धक्कादायक व्हिडिओ दादर स्टेशनवरुन समोर आला आहे जो पाहून सकाळी बाहेर नाश्ता करणाऱ्या मुंबईकरांच्या पायाखालची जमीन सरकेल.
दादर स्टेशनवरील धक्कादायक VIDEO
मुंबईत खाद्यपदार्थांमधील भेसळ, उघड्यावरील अन्न आणि शिळ्या अन्नाची विक्री यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याशी व जीवाशी सर्रास खेळ सुरू आहे. नामांकित हॉटेल्सपासून ते रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांपर्यंत अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि शिळ्या अन्नाचा वापर होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईत उघड झाले आहे असाच प्रकार दादर स्टेशनवरुन समोर आला आहे.
दादर स्टेशनवर सकाळी सकाळी नाश्ता करणाऱ्या ग्राहकांना आदल्या दिवशीचे शिळेच खाद्यपदार्थ दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने तिला आलेला अनुभव सांगत हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तरुणी म्हणते की आम्ही गडसंवर्धनासाठी गेलो होतो, तिथून आम्ही चार वाजता दादर स्टेशनवर पोहोचलो. यावेळी दादर स्टेशनवर तिला एक धक्कादायक प्रकार दिसला.
ग्राहकांच्या जिवाशी खेळ
दादर स्टेशनवर फ्लॅटफॉर्म क्रमांक १ वर असलेल्या एका दुकानदाराने आत्ताच दुकान खोलले आहे आणि दुकान उघडल्या उघडल्या त्याच्या काऊंटरला वडापाव, समोसे दिसत विक्रीसाठी दिसत आहेत. म्हणजेच आदल्या रात्रीचेच शिळे अन्नपदार्थ तो विक्रीसाठी ठेवत आहे. हेच पदार्थ तो सकाळी नाश्ता करणाऱ्या ग्राहकांना खायला देणार.. अशाप्रकारे ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु असून सकाळचा नाश्ता करताना काळजी घ्या, असं या तरुणीने म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world