
रायगड: शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली होती. भरत गोगावले यांनी घरामध्ये अघोरी पूजा केल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला होता, ज्याचे व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही नवा व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी घरामध्ये अघोरी पूजा केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ठाकरे गटानंतर आता महायुतीमधील शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही भरत गोगावले यांचा नवीन व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून भरत गोगावलेंनी घरात अघोरी पूजा केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री... असं सूरज चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. म्हणजेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी भरत गोगावलेंनी ही अघोरी पूजा केली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार कलगीतुरा सुरु आहे. अदिती तटकरे यांच्या नावाला भरत गोगावलेंकडून जोरदार विरोध होत आहे. अशातच या नव्या व्हिडिओने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, पूजा करण्याचा सर्वांना अधिकार आहे, पूजा ही अघोरी नसते.. अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी केली होती. त्यानंतर आता आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आल्याने गोगावलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावर आता भरतशेठ काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world