Sushma Andhare: 'बाई जमिनीवर या...', सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर खरमरीत टीका, 'ती' पोस्ट चर्चेत!

चिल्लर तरी चलनात चालते तुम्ही चलनातही राहणार नाहीत.  म्हणून, पुन्हा एकदा विनंती आहे, बाई जमिनीवर या, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Sushma Andhare Vs Rupali Chakankar: राज्यामध्ये सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणात पोलीस प्रशासनासह महिला आयोगाचाही हलगर्जीपणा पाहायला मिळाल्याचा आरोप होत आहे. यावरुनच बोलताना रुपाली चाकणकर यांनी चिल्लरचा आवाज जास्त झाला, अशी टीका केली होती. चाकणकर यांच्या या टिकेनंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. अंधारे यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

काय आहे सुषमा अंधारेंची पोस्ट?

वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्त्रियांवरील सासर घर कडून होणारे अत्याचार आणि हुंडाबळीच्या केसेस चर्चेला आल्या. कौटुंबिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत अर्थातच 498 नुसार या महिलांना कायदेशीर मदत मिळण्याचा एक मार्ग आहे मात्र त्याआधीही त्यांच्यासाठी एक यंत्रणा उभी केली आहे ती महिला आयोग नावाची.  अपेक्षा अशी आहे की या आयोगाने, महिलांशी संबंधित असणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटनांची तातडीने माहिती घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी. 

Advertisement

घटना कुठेही घडू शकते. बदलापूरच्या शाळेत एका चिमुरडीवर झालेला अत्याचार असेल किंवा भंडारा लाखनीमध्ये एका मानसिक संतुलन हरवलेल्या महिलेवरचा सामूहिक बलात्कार असेल किंवा स्वारगेट बस स्थानकातील घटना असेल किंवा वसईच्या भर रस्त्यामध्ये तरुणीचा दिवसाढवळ्या झालेला खून असेल किंवा वैष्णवी हगवणे हे हुंडाबळी प्रकरण असेल.  अशी प्रकरणा जेव्हा उद्भवतात तेव्हा लोकांचा संताप होणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि लोकांनी संतापून संबंधित यंत्रणा अर्थात महिला आयोगाला प्रश्न विचारणे सुद्धा फार सहज आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: Cannes 2025: बनारसी साडी आणि सिंदूर, ऐश्वर्या रायकडून घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम)

काल तर म्हणे , छावा संघटनेने त्यांना घेराव घालत, " तुम्ही वेळेत दिवे लावले असते तर आज ही घटना घडली नसती. तुम्ही नीट जबाबदारी का पार पाडत नाही? असे प्रश्न विचारून हैराण केले.  पण या सगळ्यांचा परिणाम काय तर, या प्रश्नांची उत्तरे शांतपणे द्यायला बांधील असताना सुद्धा आणि याच कामासाठी नेमणूक असताना सुद्धा ती उत्तरे देण्याचे अध्यक्ष बाईंनी टाळले. पत्रकार आणि माध्यमांना धडपणे उत्तरे दिली नाहीत.  गुन्हेगारांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर शांतपणे स्पष्टीकरण देण्याऐवजी पत्रकारांशी अरेरावी केली.  आणि आज तर अध्यक्ष बाईंनी कहरच केला. आयोगाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार,  विचारवंत,  सामाजिक कार्यकर्ते,  स्त्रीवादी लेखिका , छावा सारख्या संघटना यांना बाईंनी चक्क चिल्लर ठरवलं...! 

Advertisement

बाई, जमिनीवर या.  तुम्ही ज्या  पिडीत महिला किंवा या पीडित महिलांसाठी लढणाऱ्या इतर महिला , पत्रकार कार्यकर्ते , त्यांचे नातेवाईक जर तुम्हाला प्रश्न विचारत आहेत  जर त्यांना उत्तरे द्यायला तुम्ही बांधील आहात. पण  उलट तुम्ही त्यांना चिल्लर ठरवताय. पण बाई, याच चिल्लर लोकांच्या कराच्या पैशातून  तुमची खुर्ची, तुमचे वेतन भत्ते भागतात याचं भान ठेवा...!  ज्या पिडीत महिलांच्या निमित्ताने हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत त्या महिलांना लाडकी बहीण म्हणत तुमच्या नेत्याने निवडणुकीच्या काळात मते मागितलेली आहेत.  तुम्ही त्यांना चिल्लर म्हणताय.. ? खुर्चीचा इतका अहंकार बरा नव्हे.

(नक्की वाचा: विशाल निकमच्या खऱ्या आयुष्यातील मिस फायर आहे ही अभिनेत्री? त्या कमेंटची होतेय चर्चा)

उत्तर देणे ही तुमची जबाबदारी आहे. चिडचिड होत असेल. काम करणं जमत नसेल. कार्पोरेट पार्ट्यांमधून मधून बाहेर यायला वेळ नसेल तर बिनधास्त राजीनामा द्या खुर्ची रिकामी करा एखाद्या लायक माणसाला त्याच्यावर बसू द्या. मग तुम्हाला कोणीही प्रश्न विचारणार नाही आणि तुमच्या कार्यपद्धतीवर टीकाही करणार नाही.  पण तुम्ही जर त्या खुर्चीवर असाल तर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातीलच... सोसायची तयारी ठेवा.  ज्या पत्रकार,  लेखक , कार्यकर्ते सामान्य नागरिक स्त्रीवादी , विचारवंत यांना तुम्ही चिल्लर ठरवताय ना त्यांनी जर खरच ठरवलं तर चिल्लर तरी चलनात चालते तुम्ही चलनातही राहणार नाहीत.  म्हणून, पुन्हा एकदा विनंती आहे, बाई जमिनीवर या, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.