काम करणारा भाऊ पाहिजे की #$@त्या बनवणारी बहीण पाहिजे, भरत गोगावले यांचं वादग्रस्त वक्तव्य

माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भरत गोगावली यांनी स्नेहल जगताप यांचा नाव न घेता म्हटलं की, तुम्हाला काम करणारा भाऊ पाहिजे की #@%त्या बनवणारी बहीण पाहिजे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबूब जमादार, रायगड

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि एसटी महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भरत गोगावले यांची शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. महाडमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेवरून टीका करताना त्यांनी स्नेहल जगताप यांना उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणी केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. भरत गोगावली यांनी स्नेहल जगताप यांचा नाव न घेता म्हटलं की, "तुम्हाला काम करणारा भाऊ पाहिजे की #@%त्या बनवणारी बहीण पाहिजे."

(नक्की वाचा-  अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? शिवसेना शिंदे गट 'ही' जागा सोडण्यास तयार?)

भरत गोगावले यांच्या वादग्रस्त विधानानंतर स्नेहल जगताप त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. स्नेहल जगताप यांनी म्हटलं की, बेताल वक्तव्य केलं की प्रसिद्धी मिळते असं भरत गोगावले यांना वाटतंय. बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचं गोगावले यांचं जुनं नाटक आहे.

(नक्की वाचा- 'मी नक्कीच मुख्यमंत्री होणार' दावा कोणाचा? प्रतिक्रिया काय आली?)

एकीकडे लाडकी बहीण योजना चालवायची आणि दुसरीकडे महिलांबाबत अशी बेताल वक्तव्य गोगावले करतं आहेत. गोगावले यांनी केलेलं वक्तव्य मला जाणून-बुजून उद्देशून केलेल वक्तव्य आहे. ही आपली संस्कृती नाही. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावी, असंही स्नेहल जगताप यांनी म्हटलं. 

Advertisement

Topics mentioned in this article