महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणूक लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. मात्र अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याची चर्चा आता सुरु झाली आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी शिंदेंची शिवसेना जागा सोडायला तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर शिवसेना शिंदे गट त्यांच्यासाठी जागा सोडायला तयार आहे. अमित ठाकरेंसाठी भांडूप मतदारसंघ सोडायला शिंदेंची शिवसेना तयार असल्याची माहिती आहे. मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली तर ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.
(नक्की वाचा- 'मी नक्कीच मुख्यमंत्री होणार' दावा कोणाचा? प्रतिक्रिया काय आली?)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजून अमित ठाकरे यांच्या उमेदवारी बद्दल अद्याप निर्णय घेतलेला नाही. अमित ठाकरे यांनी भांडुप, मागाठाणे आणि माहीम येथून निवडणूक लढवावी अशी मनसे कार्यकर्त्यांची मागणी आहे. या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मागणी करणारे बॅनरही काही दिवसांपूर्वी लावले होते.
मनसेचा 225 पर्यंत जागा लढण्याचा निर्धार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना 200 ते 225 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. यानंतर राज ठाकरे यांनी विदर्भ आमि मराठवाड्याचा दौराही केला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसेचे काही उमेदवार जाहीर केले आहेत.
(नक्की वाचा- - महायुतीत कोकणात धुसफूस? गुप्त बैठकांचा सपाटा, कदम- सामंतांचे टेन्शन वाढले)
मुंबईत बाळा नांदगावकर यांना शिवडी येथून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर वरळीतून संदीप देशपांडे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. संदीप देशपांडे आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world