Sanjay Raut: आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकांसह राज्यातील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सर्वात मोठे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व निवडणूका स्वबळावर लढू... असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
'नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतय. मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
तसेच लोकसभेमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती.. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिका मध्ये स्वबळावर निवडणूक लढवू, असे त्यांनी स्पष्ट केले.
AAP MLA Death: खळबळजनक! आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, अपघात की घातपात? कुटुंबियाचा मोठा दावा
कोण कुठे जाणार, कोण कुठे येणार? हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका आयडिओलॉजी असते. तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहे, ते कुठल्या आयडिओलॉजी मध्ये बसते. जर राजकीय तुरुंगात टाकण्याची परंपरा तुम्ही सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू. मात्र जोपर्यंत तुम्ही तानाशाही करणार, भ्रष्टाचारींना सोबत घेऊन सरकार चालवनार, तोपर्यंत आमचा संघर्ष त्यांच्याशी राहणार असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला.