Boy Order Google TV Viral VIDEO: आजकाल लहान लहान मुले मोबाईल, कॉम्प्युटर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानात रमलेली पाहायला मिळतात. तंत्रज्ञानाचे ज्ञान मुलांसाठी महत्त्वाचे असले तरी मात्र त्याचा अतिवापर धोकादायक आहे. अनेकदा लहान मुले असा काही प्रताप करतात की पालकांवर कपाळावर हात मारुन घ्यायची वेळ येते. असाच एक मजेशीर अन् विचार करायला लावणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Malvan News: थरकाप उडवणारा VIDEO! त्याचा जीव गेला अन् मित्र नाचत होते; स्विमिंग पूलमध्ये भयंकर घडलं!
चिमुकल्याचा प्रताप, आईला मनस्ताप
सोशल मीडियावर सध्या एका व्हायरल व्हिडिओची तुफान चर्चा होत आहे, ज्याने नेटकरीही थक्क झाले आहेत. बेंगळुरुमधील एका चिमुकल्याने आपल्या आईच्या नकळत तिच्या फोनवरून गुपचूप ४३-इंचाचा गूगल टीव्ही ऑर्डर केला. ज्यावेळी डिलिव्हरी बॉय नवा टीव्ही घेऊन दारात आला त्यावेळी मुलाच्या आईलाही धक्का बसला. आपल्या मुलाच्या या प्रतापाने आई चांगलीच संतापल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
जेव्हा डिलिव्हरी करणारा व्यक्ती गूगल टीव्हीचा बॉक्स घेऊन तिच्या दारात आला तेव्हा मुलाच्या आईला धक्काच बसला. आई गोंधळली आणि तिने डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला सांगितले की तिने काहीही ऑर्डर केले नव्हते. नंतर तिच्या लक्षात आले की तिच्या तंत्रज्ञान-कुशल मुलाने एका ई-कॉमर्स ॲपवर सेव्ह केलेल्या तिच्या पेमेंट डिटेल्सचा वापर करून ती महागडी वस्तू ऑर्डर केली होती. आईने चिमुकल्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितलेले कारणही अत्यंत मजेशीर होते.
तू टीव्हीवर सारख्या मालिका बघतेस मला कार्टुन बघायचं होतं म्हणून मी माझा टीव्ही ऑर्डर केला असं कारण त्याने सांगितले. चिमुकल्याचा हा कारनामा पाहून आईने त्याला चांगलेच धपाटे घातले. महत्त्वाचं म्हणजे त्या नको असलेल्या टीव्हीच्या डिलिव्हरीमुळे त्याच्या आईला रिटर्न पॉलिसी शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.
A boy being confronted by his mother in front of a delivery person over a large 65” Google TV box he ordered with her Phone😭 pic.twitter.com/V7pxpE8Jho
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 28, 2026
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्यासोबत घडलेले मजेदार किस्से, पालकत्वाचे सल्ले आणि वै त्यांच्या मुलांनी चुकून ऑनलाइन ऑर्डर कशा दिल्या हे सांगितले, तर काहींनी पेमेंट तपशील आणि शॉपिंग ॲप्स मुलांच्या आवाक्यात ठेवल्याबद्दल पालकांना दोष दिला. अशा घटना टाळण्यासाठी पासवर्ड किंवा ओटीपी (वन-टाइम व्हेरिफिकेशन) सक्षम करण्याचा सल्ला अनेकांनी दिला. तर काही जण आजची मुले किती सहजपणे स्मार्टफोन आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वापरतात हे पाहून चकितही झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world