पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील स्पा सेंटरनंतर रत्नागिरीतल्या खेडशी येथील गौरव लॉज येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे अन्व्हेषण शाखा आणि ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत चार मुलींची सुटका केली. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. दरम्यान हा लॉज कोकण नगर येथील अरमान करीम खान हा चालवत असल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी आरोपी अरमानला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही दिवसांपासून या लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्व्हेषण शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्व्हेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत मुंबई आणि सुरत येथील चार मुलींची सुटका करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत लॉज चालक अरमानविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
पुण्यातही स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील बाणेर परिसरातून हा प्रकार समोर आला आहे. बाणेर परिसरात 24 थाय स्पा नावाने एक सेंटर सुरू होतं. प्रथमदर्शनी येथे थाय स्पा सुरू असल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली बाप-लेकाने सेक्स रॅकेटचा धंदा चालवत होते, हे समोर आलं आहे.