शुभम बायास्कर, अमरावती
मेळघाटातील आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गर्भवती महिलेला ॲम्बुलन्स न मिळाल्याने बाळासह मातेचा मृत्यू झाला आहे. मेळघाटातील दहेंद्र येथील कविता अनिल साकोम या 20 वर्षीय महिलेची ॲम्बुलन्स न मिळाल्याने शनिवारी दुपारी घरीच प्रसूती झाली होता. बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता.
महिलेला ॲम्बुलन्स न मिळाल्याने खाजगी वाहनाने चुर्नी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर अचलपूर अमरावती येथे महिलांना हलवण्यात आलं होतं. मात्र रविवारी सकाळी 6 वाजता कविता हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दहेंद्री गावात आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली असती तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. तीन दिवसांपूर्वी सोनोग्राफीसाठी सुद्धा आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिलेली नव्हती, असा आरोप महिलेच्या सासू व पतीने केला आहे.
पती अनिल साकोमने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी माझ्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली होती. आम्ही अॅम्बुलन्सला फोन केला मात्र अॅम्बुलन्स काही आली नाही. त्यामुळे पत्नीची घरीच प्रसुती झाली. बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मी खासगी गाडी घेऊन पत्नीला चुर्नी येथे रुग्णालयात घेऊन गेलो. तिथून तिला अचलपूर येथे नेले.
मात्र तिथून डॉक्टरांनी अमरावती येथे हलवण्यास सांगितलं. मात्र तिथे पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वेळेत अॅम्बुलन्स मिळाली असती तर माझी पत्नी वाचली असती, ती आज माझ्यासोबत असती. यासाठी कुणाला जबाबदार धरायचं असा सवालही अनिल यांनी