मनोज सातवी, पालघर:
Mumbai News: मुंबईतल्या माजी अंडर-16 फुटबॉलपटू सागर सोरटीचा मेंढवन खिंडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गा लगत असलेल्या जंगलात गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. तो पुण्याला खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. या घटनेने कुटुंबीय हादरुन गेले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर तालुक्यातील मेंढवन जंगलात मुंबईतील माजी अंडर-16 फुटबॉलपटू सागर सोरटी (३५) याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. सागर हा १५ नोव्हेंबरला “पुणे येथे फुटबॉल खेळायला जात आहे” असे सांगून घराबाहेर पडला होता.
Accident News: अचानक ब्रेक मारला, 3 गाड्या धडकल्या, विचित्र अपघातात चिमुकल्याचा अंत
मात्र दुसऱ्या दिवशीच त्याचा संपर्क तुटला. कुटुंबीयांनी सांगितले की तो गेल्या दोन वर्षांपासून कोणत्यातरी कारणाने मानसिक तणावात होता. विशेष म्हणजे त्याच्या धाकट्या भावाचे लग्न अवघ्या 15 दिवसांवर आले होते. त्यात त्याने लग्नासाठी नवे कपडे शिवण्यास नकार दिल्याने कुटुंबीय चिंतेत होते, पालघर पोलिसांनी सागरचा मृतदेह मुंबईतल्या जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, अहवालानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊन स्पष्ट होऊन पुढील कारवाई करता येईल, अशी माहिती पालघर चे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी दिली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ज्या घरात लग्नाची तयारी सुरु होती, त्याच घरावर आता शोककळा पसरली आहे.
Virar News: आधी VIDEO कॉल, नंतर उचलले टोकाचे पाऊल.. विरारमधील हृदयद्रावक घटना