Chhatrapati Sambhajinagar Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात भीषण अपघातांची मालिका सुरु आहे. चार दिवसांपूर्वीच ताम्हिणी घाटामध्ये गाडी दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये एका विचित्र अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका बेजबाबदार चारचाकी चालकाने वेगात जात असताना अचानक ब्रेक दाबल्याने मागे असलेल्या बेसावध लोडिंग रिक्षाचालकही जागेवर थांबला. मागून येत असलेल्या दोन कार रिक्षावर आदळून सेव्हनहिल उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी २:३० वाजता विचित्र अपघात घडला. यात अभिनव नावाच्या पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
Virar News: आधी VIDEO कॉल, नंतर उचलले टोकाचे पाऊल.. विरारमधील हृदयद्रावक घटना
मात्र, जवाहरनगर पोलिसांनी मृत्यूबाबत कोणतीही माहिती प्राप्त नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, एक कारचालक हायकोर्टाकडून आकाशवाणीच्या दिशेने सुसाट वेगात जात होता. सेव्हनहिल उड्डाणपूल चढल्यावर पुलाच्या मधोमध त्याने अचानक ब्रेक दाबले. त्याच वेळेला अंड्याची वाहतूक करणारी लोडिंग रिक्षा त्या कारच्या मागे होती.
Chhatrapati Sambhajinagar | Car Accident | अचानक ब्रेक! छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 गाड्यांचा विचित्र अपघात, 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू..| NDTV मराठी#chhtrapatisambhajinagar #accidentnews #ndtvmarathi pic.twitter.com/RA8DorcbCL
— NDTV Marathi (@NDTVMarathi) November 23, 2025
समोरील कार अचानक थांबल्याने रिक्षाचालकाने ब्रेक दाबले व ती जागेवर थांबली. मागून असलेली कार रिक्षावर आदळली. पाठोपाठ असलेली कार देखील पहिल्या कारवर आदळली. यात दोन्ही कारचे समोरून नुकसान झाले. शेवटच्या कारमध्ये समोरच्या सिटवर बसलेल्या बालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Police Robbery: पोलिसच निघाले लुटेरे! DSP सोबत छापा टाकायला गेले अन् 3 लाख चोरले, कुठे घडली ही घटना?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world