श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचे दरेगावातून सूचक संदेश

आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे संकेत दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी पार पडले असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी जाहीर केलं आहे. दरम्यान अद्यापही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांपूर्वी मूळ गावी दरेगावला रवाना झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत मोठे संकेत दिले आहेत. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांच्या उत्तराने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

नक्की वाचा - राज ठाकरेंना मोठा धक्का,  मनसेच्या मोठ्या नेत्याचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार असल्याचं सांगितलं जात असताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याची चर्चा आहे. दरम्यान शिंदे स्वत: उपमुख्यमंत्री होणार नसले तरी ते आपल्या पक्षात दुसऱ्या व्यक्तीला ते पद देऊ शकतात अशी माहिती आहे. श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, त्यावरही बैठकीत चर्चा होईल. त्यामुळे श्रीकांत शिंदेंकडे उपमुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यता वाढली आहे. 

गृहमंत्रालय, ऊर्जा खाते शिंदेंना देण्यास भाजपकडून विरोध केला जात असून दुसरीकडे  एकनाथ शिंदे गृह, ऊर्जा, जलसंपदा खात्यासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्रालयही राहणार असून एकनाथ शिंदे यांना पर्यायी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेतही एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदावरही मोठं वक्तव्य केलं आहे.  गृहमंत्रीपदासह विधानसभा अध्यक्षपदावरही चर्चा होईल असं शिंदे यावेळी म्हणाले. 

एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यांचा अर्थ काय?
पत्रकाराने एकनाथ शिंदे यांना विचारलं की, श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार का? एकनाथ शिंदे म्हणाले अजूनही चर्चा सुरू आहे. यावरुन श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाची शक्यता नाकारली नाही. गृहमंत्रिपदाबाबतही एकनाथ शिंदेंनी चर्चा होईल असं म्हटलंय. यावरुन गृहमं त्रिपदासाठी शिंदे आग्रही असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतही एकनाथ शिंदे अजूनही आशादायी असून ज्याप्रमाणे शिंदे स्वत: केलेल्या कामांवर फोकस करतायत त्यावरुन त्यांचा दावा अजूनही कायम आहे. शिंदे भाजपसोबत जोरदार बार्गेनिंग करणार याचे संकेत वाढले आहेत. शपथविधीची तारीख जाहीर झाली असली तरीसुद्धा शिंदे अजूनही संघर्षाच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. 

Advertisement