विधानसभा निवडणुकीत झालेल्या सपाटून पराभवानंतर मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. राज ठाकरेंच्या गटातील एका मोठ्या नेत्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेला ठाणे पालघर जिल्ह्यात मोठं खिंडार पडलं आहे.
नक्की वाचा - दारुण पराभवानंतर बैठक अन् मनसैनिकांना नवे आदेश; राज ठाकरेंची रणनिती काय?
मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे पालघरमध्ये पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना याबाबत पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये दिल्यानुसार,
विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्याच आपण मला माफ करावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world