यशपाल सोनकांबळे, पुणे:
Baramati Assembly by Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आज पार पडत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात असून मतदानाला बारामतीकरांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अशातच जय पवार यांनी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभेचा उमेदवार आपण असेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत. दुसरीकडे 2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का? याबाबत श्रीनिवास पवार यांनीही महत्त्वाचं विधान केले आहे.
Manoj Jarange Patil: 'पाय एकीकडे, हात एकीकडे', कराड गँगच्या धमकीनंतर मनोज जरांगेंचं थेट आव्हान
जय पवारांनी रणशिंग फुंकले, श्रीनिवास पवारही बोलले
काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये योगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार आणि आई शर्मिला पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जय पवार यांनी महत्त्वाचं विधान केले. "लोकांची मागणी आहे की 2029 मध्ये बारामती चा उमेदवार मी व्हावे. माझी अपेक्षा आहे की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं लोकांची ती इच्छा आहे," असं ते म्हणाले.
यावर युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनीही उत्तर दिले आहे. "जय पवार यांनी 2029 विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे 2029 ला जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत होईल का नाही याबाबत आत्ताच बोलता येणार नाही. परंतु त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे. रोहित पवारांनी या संदर्भ सविस्तर सांगितले आहे. आता आमचा फोकस बारामती निवडणुकीवर आहे. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा आमचा विश्वास आहे," असं श्रीनिवास पवार म्हणाले.
रोहित पवारही बारामतीच्या मैदानात?
दुसरीकडे, रोहित पवार यांनीही बारामती विधानसभा लढवण्याची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. यावरही रोहित पवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. 2029 ची विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय लढाई होईल. अजित दादा हयात असताना विलीनीकरणाची चर्चा सुरू होती. परंतु आता विलिनीकरणाची चर्चा थांबली आहे. शरद पवार यांची इच्छा असेल तर तुम्ही बारामती निवडणूक लढवाल का? या प्रश्नावर त्यांनी मी कर्जत जामखेड विधानसभेतच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. जय पवारांचे वक्तव्य हे व्यक्तिगत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world