जाहिरात

Sindhudurg Election: महायुतीचा 'बिनविरोध पॅटर्न' सुसाट! सिंधुदुर्गात भाजप- शिंदेगटाची जोरदार मुसंडी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिंदे शिवसेनेचा १ असे जिल्हा परिषदेत एकूण ८ उमदेवार बिनविरोध झाले आहेत.

Sindhudurg Election: महायुतीचा 'बिनविरोध पॅटर्न' सुसाट! सिंधुदुर्गात भाजप- शिंदेगटाची जोरदार मुसंडी

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग:

Sindhudurg ZP Election 2026: राज्यातील महानगरपालिकांपासून सुरु असलेला महायुतीचा बिनविरोध पॅटर्न जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांमध्येही पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्यासोबतच तब्बल 17 पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. निवडून आलेल्यांमध्ये  भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे. 

राज्यात सध्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांप्रमाणे या निवडणुकांमध्येही महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळत आहे. ५० सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिंदे शिवसेनेचा १ असे जिल्हा परिषदेत एकूण ८ उमदेवार बिनविरोध झाले आहेत. तर १०० पंचायत समिती सदस्यांमधून भारतीय जनता पार्टीचे १६ सदस्य बिनविरोध आणि शिंदे शिवसेनेचा १ सदस्य बिनविरोध असे एकूण १७ सदस्य बिनविरोध झालेला आहे. 

Dharashiv Election: 'दुसऱ्या कोणाला अक्कल नाही..' ओमराजेंची पद्मसिंह पाटलांवर टीका, उमेदवारीवरुन डिवचलं

जिल्हा परिषद निवडणूक सिंधुदुर्ग: बिनविरोध उमेदवारांची यादी

  • १) खारेपाटण; प्राची इस्वालकर(भाजप) 
  • २) बांदा : प्रमोद कामत (भाजप)
  • ३) जाणवली : रुहिता राजेश तांबे ( भाजची कार्यकर्ती उमेदवार शिवसेना)
  • ४) पडेल : सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
  • ५)बापर्डे : अवनी अमोल तेली (भाजप)
  • ६) पोंगुर्ले : अनुराधा महेश नारकर (भाजप) 
  • ७) किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप)
  • ८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

पंचायत समिती बिनविरोध उमेदवारांची यादी:

कणकवली (६ बिनविरोध)

  • १)वरवडे ; सोनू सावंत (भाजपा)
  • २)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)
  • ३) जाणवली : महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)
  • ४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप) 
  • ५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप) 
  • ६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप) 

देवगड तालुक्यातील पंचायत समिती(६ बिनविरोध)

  • १)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
  • २)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
  • ३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
  • ४) फणसगाव -  समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)
  • ५) शिरगाव - शितल सुरेश तावडे (भाजप) 
  • ६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप) 

BMC News: मुंबई महापालिकेत नवं समीकरण; मनसे महायुतीत सामील होणार? पडद्यामागे काय घडतंय?

पंचायत समिती वैभववाडी( बिनविरोध): कोकिसरे: साधना सुधीर नकाशे (भाजप)

पंचायत समिती वेंगुर्ले (बिनविरोध): आसोली; संकेत धुरी (भाजप)

मालवण पंचायत समिती ( बिनविरोध): अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर   (भाजप)

सावंतवाडी पंचायत समिती (बिनविरोध): शेरले; महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती (बिनविरोध): कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com