Pune News : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून अद्याप सुटका नाहीच; उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम रखडलं!

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Sinhagad Traffic Jam) कमी करण्यासाठी 118 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सप्टेंबर 2022 मध्ये झाले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यातील सिंहगड उड्डाणपुलाच्या (Sinhagad Flyover) तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले असून हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक महिना लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल 15 जून रोजी वाहतुकीसाठी खुला (Pune Traffic issue) होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते.

परंतू मे आणि जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर या कामाचे नियोजन बिघडल्याचं चित्र आहे. त्यामुळे माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानचा उड्डाणपूल सुरू होण्यास अजून किमान एक महिना लागण्याची शक्यता आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Sinhagad Road Traffic Jam) कमी करण्यासाठी 118 कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सप्टेंबर 2022 मध्ये झाले. यामध्ये राजाराम पूल चौक, विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटर या दोन टप्प्यातील उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले. या दोन्ही पुलांचे लोकार्पण अनुक्रमे 26 जानेवारी 2025 आणि 1 मे 205 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आहे.

नक्की वाचा - Pune News: 'पुणे स्टेशनला 'बाजीराव पेशवें'चे नाव द्या' कुणी केली मागणी?

तिसऱ्या टप्प्यातील माणिकबाग ते हिंगणे या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन 15 जून रोजी होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. त्याचे कामही वेगात सुरू होते. पण मे महिन्यापासून सतत मोठा पाऊस पडत आहे. जून महिन्यातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे कामाची गती संथ झाली आहे. हे काम जुलै महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Topics mentioned in this article